IND vs NZ : न्यूझीलंडची सांघिक खेळी; भारताला विजयाासाठी १५४ धावांचे लक्ष्य

IND vs NZ : न्यूझीलंडची सांघिक खेळी; भारताला विजयाासाठी १५४ धावांचे लक्ष्य

सध्या सुरू असलेल्या भारत विरूध्द न्यूझीलंडच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने सांघिक खेळीच्या जोरावर भारताला विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य दिले आहे. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि डेरी मिचेलने प्रत्येकी ३१-३१ धावांची खेळी करून संघाला चांगली सुरूवात करून दिली. न्यूझीलंडकडून कोणत्याच फलंदाजाला साजेशी धावसंख्या उभारता आली नाही. बदल्यात संघाने २० षटकांत ६ बाद १५३ धावा केल्या आणि भारताला १५४ धावांचे अपेक्षित आव्हान दिले. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक २१ चेंडूत ३४ धावा केल्या. तर मार्क चॅपमन (२१), टिम सेफर्ट (१३) अशा धावा केल्या.

तत्पुर्वी, सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडना प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. रांचीच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून सांघिक गोलंदाजी झाली. हर्षल पटेलने २ बळी घेतले, तर भुवनेश्वर कुमार, दिपक चाहर, अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. भारतीय गोलंदांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला २० षटकांत १५३ धावांवर रोखले.

दरम्यान आजचा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी असणार आहे तर भारतीय संघाला धूळ चारून मालिकेत बरोबरी साधण्याचे न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान असणार आहे. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या सांघिक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने प्रतिस्पर्धी संघाला १५३ धावांवर रोखले आहे. पण न्यूझीलंडकडेदेखील प्रभावी गोलंदाजांची फौज आहे. त्यामुळे साहजिकच भारतीय फलंदाज सुरूवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. तर न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी गोलंदाजांकडून मोठी अपेक्षा असणार आहे.


हे ही वाचा: PAK vs BAN : बांगलादेशची कडवी झुंज; पाकला १२८ धावा काढताना फुटला घाम


 

First Published on: November 19, 2021 9:08 PM
Exit mobile version