“अन् त्याने डोक्यावर लघवी केली…, यॉर्कशायर क्लबवर क्रिकेटपटूने केला वर्णद्वेषाचा आरोप

“अन् त्याने डोक्यावर लघवी केली…, यॉर्कशायर क्लबवर क्रिकेटपटूने केला वर्णद्वेषाचा आरोप

इंग्लंड क्रिकेट आणि वर्णभेदाचे जुने नाते आहे. यापूर्वी देखील इंग्लंडच्या क्रिकेटवर कित्येक वेळा वर्णद्वेषाचा आरोप लागला आहे. अझीम रफिकची केस पूर्णपणे संपली नव्हती तर आता यॉर्कशायर क्लबचा जुन्या क्रिकेटरने गंभीर खुलासे केले आहेत. ते खुलासे या ऐतिहासिक क्लबच्या नावाला सुरूंग लावण्यासारखे आहेत. क्लबचे माजी क्रिकेटर तबस्सुम भाटी यांनी सांगितले की, माझ्यावर लगातार असभ्य भाषेत टिप्पणी केली जात होती. तर भाटी यांनी आणखी म्हटले की, एका गोऱ्या क्रिकेटरने त्याच्या रूममधून माझ्या डोक्यावर लघवी केली होती.

एका मुलाखतीत तबस्सुस भाटी यांनी सांगितले, “यॉर्कशायर क्रिकेट क्लबचा आमच्या खेळाडूंसोबत सतत व्यवहार खराब राहिला आहे. मैदानात आणि मैदानाच्या बाहेर इंग्लिश खेळाडूंना वगळून आमच्याशी गैरव्यवहार केला जात होता. खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या बिगर आशियाई खेळाडूंना संघात स्थान मिळायचे, मात्र त्यांना आशियाई खेळाडूंना संघात स्थान मिळाले नाही”.

अझीम रफिकने सुध्दा केले होते आरोप

पाकिस्तानच्या वंशाचा असलेल्या अझीम रफिकने सांगितले होते की, आशियाई देशाचा असल्यामुळे त्याला कित्येक वर्णद्वेषाच्या टिप्पणींचा सामना करावा लागला होता. कायद्याद्वारे फर्म स्क्वेअर पॅटन बग्स रफिकच्या आरोपांची चौकशी करत होती. तर रफिकने आता यॉर्कशायर क्रिकेटशी करार केला आहे.

यार्कशायरचे अध्यक्ष रोजर हेटनने आपल्यावर झालेल्या वर्णद्वेषाच्या आरोपांच्या वादावर राजीनामा दिला होता. हटन यांनी आपल्या या निर्णयावर माफी मागण्यावर नकार दिला होता. हटन २०२० मध्ये यार्कशॉयर बोर्डासोबत जोडले होते.


हे ही वाचा: IND VS NZ : KKR कडून १६०० धावा केल्या, पण निवड समितीने नाकारले; हरभजन सिंगचा संताप


 

First Published on: November 11, 2021 10:20 PM
Exit mobile version