द्युती चंदने निवडला आपला जीवनसाथी

द्युती चंदने निवडला आपला जीवनसाथी

द्युती चंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पदक मिळवून देणारी उत्कृष्ट खेळाडू द्युती चंद हिने आपल्या खासगी आयुष्याबाबत एक खुलासा केला आहे. ‘मी माझा जीवनसाथी निवडला आहे. प्रत्येकाला आपला जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे, असे दुती चंदने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले असून तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत एक खुलासा केला.

कोण आहे द्युती चंदनचा जीवनसाथी

आशियाई स्पर्धेत भारतासाठी दोन रजत पदके पटकावणारी धावपटू द्युती चंदने आपल्या गावातील जीवनसाथी निवडला असून तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती समलैंगिक असल्याचे तिने जाहीर केले आहे. आपल्या गावातील एका मुलीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून समलैंगिक संबंध असले्याचे तिने म्हटले आहे. प्रत्येकाची व्यक्तिगत आवड – निवड असते, असे सांगतानाच सध्या माझे सर्व लक्ष्य आगामी वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि ऑलम्पिक खेळावर आहे. मात्र भविष्यात मी तिच्यासोबत सेटल होणार आहे, असेही तिने स्पष्ट केले आहे.

मला उघडपणे बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला

आयपीसी कलम ३७७ बाबत सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे मत व्यक्त केल्याने मला उघडपणे बोलण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे. मी अॅथलीट आहे. त्यामुळे माझ्याबाबतीत आपले मत तयार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. कारण कुणासोबत राहायचे आणि कुणासोबत नाही, हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. त्याचा आदर केलाच पाहिजे, असेही तिने म्हटले आहे. द्युती चंद ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील रहिवासी आहे.

याआधी द्युतीला मिळाले होते रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये द्युती चंद ही पदक मिळवून देणारी उत्कृष्ट खेळाडू होती. द्युती चंदने याआधी महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक पटकावले होते. मंगळवारच्या २०० मीटर शर्यतीमध्ये भारताच्या द्युती चंदने २३.०० सेकंदामध्ये भारताचे आव्हान कायम ठेवले. यामध्ये द्युती चंदने .०१ सेकंदाच्या अंतराने अडीडीओंग ओडीओंगीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.


वाचा – Asian games 2018: द्युती चंदने पटकावले रौप्य पदक


 

First Published on: May 19, 2019 5:11 PM
Exit mobile version