घरक्रीडाAsian games 2018: द्युती चंदने पटकावले रौप्य पदक

Asian games 2018: द्युती चंदने पटकावले रौप्य पदक

Subscribe

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अॅथलेटिक्स दुती चंदने महिलांच्या २०० मीटर शर्यतीमध्ये रौप्ट पदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेत द्युती चंदलने दुसरे रौप्य पदक पटकावले.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या अॅथलेटिक्स दुती चंदने महिलांच्या २०० मीटर शर्यतीमध्ये रौप्ट पदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मधील द्युतीचे हे दुसरे रौप्य पदक पटकावले आहे. द्युतीने २३.२० सेकंदात २०० मीटर शर्यत पूर्ण केली. बहरीनच्या इडिडियॉन्ग ओडियॉन्गने २२.९६ सेकंदात शर्यत पूर्ण करत पहिला क्रमांक पटकावत सुवर्ण पदक जिंकले. तर चीनच्या योंग ली वीने २३.२७ सेकंदात शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक जिंकले.

याआधी द्युतीला मिळाले होते रौप्य पदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये द्युती चंद ही पदक मिळवून देणारी उत्कृष्ट खेळाडू होती. द्युती चंदने याआधी महिलांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये रौप्य पदक पटकावले होते. मंगळवारच्या २०० मीटर शर्यतीमध्ये भारताच्या द्युती चंदने २३.०० सेकंदामध्ये भारताचे आव्हान कायम ठेवले. यामध्ये द्युती चंदने .०१ सेकंदाच्या अंतराने अडीडीओंग ओडीओंगीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

- Advertisement -

हीमाला एक चूक नडली

भारताची दुसरी अॅथलेटिक्स हिमा दासला मंगळवारी २०० मीटर शर्यतीमधून एका छोट्याशा चूकीमुळे बाहेर पडावे लागले होते. शर्यत सुरु करण्यासाठी स्टार्ट सिग्नल देण्यापूर्वीच हिमा दासने तिची जागा सोडल्यामुळे तिला या स्पर्धेतून बाद करण्यात आले. हिमा दासच्या या चूकीमुळे भारताला एक पदक गमवावे लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -