T20 World Cup : प्रत्येकवेळी टॉस जिंकणाराच कसा काय मॅचचा बॉस असू शकतो? ICC इवेंट्सवर गंभीर सवाल

T20 World Cup : प्रत्येकवेळी टॉस जिंकणाराच कसा काय मॅचचा बॉस असू शकतो? ICC इवेंट्सवर गंभीर सवाल

T20 World Cup : प्रत्येक वेळी टॉसच कसा काय बॉस असू शकतो,असं म्हणत ICC इवेंट्सवर गंभीर सवाल

जवळपास महिनाभर चाललेला टी-२० विश्वचषक अखेर संपला आहे.आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये खेळला गेला. दुबईच्या मैदानावर हा शानदार सामना रंगला होता. या सामन्यात नाणेबाजीत पराभव स्वीकारुन न्यूझीलँडने फलंदाजी करत १७२ रन केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २ विकेट गमावून शेवटच्या ओव्हर आधी जबरदस्त खेळ खेळत इतिहास रचला. १६ संघांमधील युद्धात ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा चॅम्पियन संघ म्हणून उदयास आला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव करत मोठा विजय मिळवला आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. ही स्पर्धा संपली, पण यासोबतच एक मोठा प्रश्न आयसीसी इंवेट्सवर गंभीर सवाल करण्यात आले आहेत.

कारण स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते अंतिम सामन्यापर्यंत जो ट्रेंड दिसत होता तो एवढाच होता की तुम्ही टॉस जिंकलात तर मॅच तुमच्या नावावर होईल. उपांत्य फेरी, फायनलमध्ये त्याचा मोठा प्रभाव पडला, मात्र सुपर-१२ फेरीच्या सामन्या दरम्यानही असेच घडले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींकडून असे गंभीर प्रश्न विचारले जात आहेत.

 

टी-२० विश्वचषक २०२१ च्या ४५ सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकलेल्या संघाने ३० सामने जिंकले आहेत. ज्या स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळला गेला त्या स्टेडियमबद्दल, म्हणजे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमबद्दल बोलायचे तर, या स्पर्धेत एकूण १३ सामने खेळले गेले आणि ११ सामने नाणेफेक जिंकलेल्या संघाने जिंकले.ऑस्ट्रेलियाचाही विजय अशाचप्रकारे झाला.यामुळेच प्रत्येक क्रिकेटतज्ज्ञ फायनलपूर्वी सामन्यापेक्षा नाणबाजी महत्त्वाची असल्याचे सांगत होते.प्रत्येक संघाला समान संधी मिळेल, अशी आयसीसीच्या स्पर्धांमधून अपेक्षा होती.


हे ही वाचा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता


 

First Published on: November 15, 2021 11:57 PM
Exit mobile version