तामिम इक्बालचे एकहाती वर्चस्व

तामिम इक्बालचे एकहाती वर्चस्व

तामिम इक्बाल

ढाका : बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बालने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये धडाकेबाज खेळी केली. कोमिला व्हिक्टोरीयन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने वादळी खेळी करून संघाला जेतेपद पटकावून दिले. व्हिक्टोरियन संघाने अंतिम लढतीत तीन वेळा जेतेपद पटकावणार्‍या ढाका डायनामाईट्स संघाला 17 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. व्हिक्टोरियन्सचे हे बांगलादेश प्रीमिअर लीगमधील दुसरे जेतेपद ठरले.

संपूर्ण सत्रात फॉर्माशी झगडणार्‍या इक्बालने दमदार कमबॅक केले. त्याने अंतिम सामन्यात 61 चेंडूंत नाबाद 141 धावांची वादळी खेळी केली. त्याने 10 चौकार व 11 षटकार खेचले. बांगलादेश प्रीमिअर लीगमधील हे त्याचे पहिलेच शतक ठरले. तमीमची ही खेळी कोणत्याही ट्वेंटी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीतील दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. तमीमच्या फटकेबाजीच्या जोरावर व्हिक्टोरियन्स संघाने 199 धावांचा डोंगर उभा केला. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या एका डावात 10 षटके मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

ढाका डायनामाईट्सचा संघ 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 182 धावांपर्यंतच मजल मारू शकला. उपुल थरंगा ( 48) आणि रोनी तालुकदार ( 66) यांनी 102 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली, परंतु हे दोघेही माघारी परतल्यानंतर संपूर्ण संघ गडगडला.

First Published on: February 10, 2019 4:17 AM
Exit mobile version