दुखापतीनंतर शिखर धवनचे वेस्ट इंडिज दौऱ्यात ‘कमबॅक’!

दुखापतीनंतर शिखर धवनचे वेस्ट इंडिज दौऱ्यात ‘कमबॅक’!

कर्णधार विराट कोहलीसोबत शिखर धवन

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाली असून पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडे सोपवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा हा उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे विश्वचषक २०१९ स्पर्धेत दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला अष्टपैलू खेळाडू शिखर धवन हा वेस्ट इंडिज दौऱ्यातून भारतीय क्रिकेट संघात कमबॅक करणार आहे. ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताच्या टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची घोषणा आज, रविवारी करण्यात आली. याच टी-२० तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनीच्या जागी ऋषभ पंत याची निवड करण्यात आली आहे. तर कसोटीसाठी पंतसोबत रिद्धिमान साहा याला अतिरिक्त यष्टीरक्षक म्हणून घेण्यात आले आहे. एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाच सदस्यीय निवड समितीच्या बैठकीनंतर नव्या संघांची घोषणा करण्यात आली.

 वन-डे टीम – ३ सामने 

  1. विराट कोहली (कर्णधार)
  2. रोहित शर्मा (उपकर्णधार)
  3. शिखर धवन
  4. के. एल. राहुल
  5. श्रेयस अय्यर
  6. मनीष पांडे
  7. ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
  8. रवींद्र जडेजा
  9. कुलदीप यादव
  10. युजवेंद्र चहल
  11. केदार जाधव
  12. मोहम्मद शमी
  13. भुवनेश्वर कुमार
  14. खलील अहमद
  15. नवदीप सैनी

टी-२० टीम – ३ सामने 

  1. विराट कोहली (कर्णधार)
  2. रोहित शर्मा (उपकर्णधार)
  3. शिखर धवन
  4. के. एल. राहुल
  5. श्रेयस अय्यर
  6. मनीष पांडे
  7. ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
  8. कुनाल पंड्या
  9. रवींद्र जडेजा
  10. वॉशिंग्टन सुंदर
  11. राहुल चाहर
  12. भुवनेश्वर कुमार
  13. खलील अहमद
  14. दीपक चाहर
  15. नवदीप सैनी

कसोटी टीम – २ कसोटी 

  1. विराट कोहली (कर्णधार)
  2. अजिंक्य रहाणे (उपकर्णधार)
  3. मयंक अग्रवाल
  4. के. एल. राहुल
  5. चेतेश्वर पुजारा
  6. हनुमा विहारी
  7. रोहित शर्मा
  8. ऋषभ पंत (यष्टीरक्षक)
  9. रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक)
  10. आर. अश्विन
  11. रवींद्र जडेजा
  12. कुलदीप यादव
  13. इशांत शर्मा
  14. मोहम्मद शमी
  15. जसप्रीत बुमराह
  16. उमेश यादव

हेही वाचा –

…तर सुप्रिया सुळे यांनी राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटील

‘चांद्रयान-२’ अवकाशात जाण्यासाठी सज्ज

First Published on: July 21, 2019 2:54 PM
Exit mobile version