तीसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा; रोहित सलामीला येणार?

तीसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा; रोहित सलामीला येणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तीसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरुवात होणार आहे. यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. तीसऱ्या कसोटी सामन्यात सलामीला येणार आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माला उपकर्णधार करण्यात आला आहे. अंजिक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला सीडनी क्रिकेट ग्राऊंडवर ४३ वर्षानंतर कसोटीत विजय मिळवण्याची संधी आहे. दरम्यान, या सामन्यात नवदीप सैनी कसोटी क्रिकेटमधअये पदार्पण करणार आहे.

भारतीय संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शुबमन गील, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, रविंद्र जाडेजा, रविश्चंद्रन आश्वीन, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सीराज, नवदीप सैनी

 

First Published on: January 6, 2021 1:41 PM
Exit mobile version