हा माझ्यासाठी सन्मान; मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

हा माझ्यासाठी सन्मान; मिताली राजने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीप्रमाणे महिन्याच्या अखेरच्या रविवारी मन की बात मधून देशातील जनतेशी संवाद साधला. मन की बातमधून मोदींनी देशातील मुलींचं भरभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी महिला क्रिकेटपटू मिथाली राज हिचं देखील कौतुक पंतप्रधान मोदींनी केलं. मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण केल्या. मोदींचे मिताली राजने आभार मानले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करणारी मिताली राज ही पहिली भारतीय क्रिकेटपटू आहे. मिताली राज हिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांनी मिताली राज हिचं कौतुक केलं. “मिताली राज यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला. असा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू आहेत. यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन,” असं मोदींनी मन की बातमध्ये म्हटलं. यानंतर मिताली राजने ट्विट करता मोदींचे आभार मानले.

माझ्या कारकिर्दीत मी केलेल्या विक्रमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली प्रशंसा हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे, असं मिताली राजने ट्विट करता म्हटलं आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघासोबत एकदिवसीय मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला. एवढंच नव्हे तर चौथ्या सामन्यात अजून एक पराक्रम केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावा करणारी मिताली राज ही जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

First Published on: March 28, 2021 6:04 PM
Exit mobile version