IND vs AUS : टीम पेन आऊट की नॉट-आऊट? ट्विटरवर जोरदार चर्चा 

IND vs AUS : टीम पेन आऊट की नॉट-आऊट? ट्विटरवर जोरदार चर्चा 

टीम पेन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याला शनिवारपासून सुरुवात झाली. या कसोटीत भारताचा पहिला डाव १९५ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनला केवळ १३ धावाच करता आल्या. मात्र, तिसऱ्या पंचांचा निर्णय त्याच्या विरोधात गेला असता, तर तो कदाचित त्याहूनही कमी धावा करून धावचीत झाला असता. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ५५ व्या षटकात युवा कॅमरुन ग्रीनने चेंडू मिड-ऑफच्या दिशेने मारला आणि धाव काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, नॉन-स्ट्राईकवरील टीम पेन धाव काढण्यासाठी फारसा उत्सुक नव्हता. मात्र, त्याने अखेर धावण्याचा निर्णय घेतला. मिड-ऑफवरून उमेश यादवने चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे फेकला आणि पंतने बेल्स उडवण्यासाठी थोडा वेळ घेतला. त्यामुळे पेन धावचीत झाला आहे की नाही, याचा निर्णय मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे (थर्ड अंपायर) सोपवला.

First Published on: December 26, 2020 7:59 PM
Exit mobile version