‘डकवर्थ-लुईस’चे जनक टोनी लुईस यांचं निधन

‘डकवर्थ-लुईस’चे जनक टोनी लुईस यांचं निधन

Frank Duckworth (left) and Tony Lewis

क्रिकेटला प्रसिद्ध डकवर्थ-लुईस नियम देणाऱ्या गणिततज्ञ टोनी लुईस यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी
निधन झालं आहे. याबाबतची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी जाहीर केली. डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत देणाऱ्या टीमचे ते सदस्य होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये डकवर्थ-लुईस पद्धत वापरली जाते. टोनी यांनी सहकारी गणिततज्ञ फ्रँक डकवर्थ यांच्यासमवेत डकवर्थ-लुईस पद्धतीचा ११९७ मध्ये शोध लावला. आयसीसीने १९९९ मध्ये अधिकृतपणे स्वीकारला. २०१४ मध्ये डकवर्थ-लुईस-स्टर्न मेथड म्हणून या नियमाचं नाव बदलण्यात आलं. मर्यादित षटकांच्या सामन्यात पाऊस पडला तर या पद्धतीचा वापर केला जातो.


हेही वाचा – Coronavirus: अॅमेझॉन जंगलात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण


दरम्यान, या नियमावर बर्‍याचदा टीका झाली आहे. ऑस्ट्रेलियन आकडेवारीतज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी २०१४ मध्ये सध्याच्या स्कोअरिंग-रेटसह या नियमात सुधारणा केली. २०१४ मध्ये नाव बदलल्यानंतरही गणिताचे हे सूत्र जगभरात पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यांमध्ये वापरले गेले आहे, असे ईसीबीने म्हटलं आहे.

सिडनी येथे झालेल्या १९९२ वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतर हे सूत्र तयार केलं गेलं. इंग्लंडला पराभूत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १३ चेंडूंत २२ धावांची आवश्यकता होती. पावसाच्या व्यत्ययानंतर एका चेंडूवर २१ धावा करणे अशक्य होते. त्यानंतर हे सुत्र वापरण्यात आलं.

संस्थापक जोडीचा अधिक स्पष्ट बोलणारा डकवर्थ – सहकारी सांख्यिकीशास्त्रज्ञ स्टीव्हन स्टर्न यांनी कित्येक वर्षांनंतर या सूत्रात सुधारणा करण्यास मदत केली. ते म्हणाले मला रेडिओवरील क्रिस्तोफर मार्टिन-जेनकिन्स यांचं बोलणं आठवतं. ‘नक्कीच कोणीतरी काहीतरी चांगले घेऊन येऊ शकेल, आणि मला लवकरच हे समजलं की ही गणिताची समस्या आहे.

 

First Published on: April 2, 2020 11:31 AM
Exit mobile version