टर्नरच्या खेळीने सामना फिरला

टर्नरच्या खेळीने सामना फिरला

येथे सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३५९ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य दिले.त्यानंतरही ऑस्ट्रेलियाने 4 गडी राखून भारताचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज अश्टॉन टर्नरने 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने केलेल्या & धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य सहज पार केले. त्यामुळे आता बुधवारी होणारा 5 वा वन-डे सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

शिखर धवनच्या १४३ धावा आणि रोहित शर्माच्या ९३ धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ९ बाद ३५८ धावा केल्या. धमाकेदार सुरुवात करणार्‍या भारतीय जोडीने भारताला दीडशतकी सलामी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचे शतक हुकले. तो ९२ चेंडूत ९५ धावा करून बाद झाला. रिचर्डसनने रोहितला बाद करत अखेर १९३ धावांवर भारताला पहिला धक्का दिला. रोहितने ७ चौकार आणि २ षटकार खेचले. पण सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार शतक ठोकले. त्याने चौकार लगावत ९८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. सलग दोन सामन्यात शतक झळकावणार्‍या कर्णधार कोहलीला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

तो ६ चेंडूत ७ धावा करून माघारी परतला आणि भारताला तिसरा धक्का बसला. रायुडूच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश राहुलला चांगली सुरुवात मिळाली. मात्र तो ३१ चेंडूत २६ धावा काढून माघारी परतला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्याने केवळ १ चौकार लगावला. फटकेबाजी करण्यास सुरुवात करताच ऋषभ पंत माघारी परतला. त्याने २४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत ३६ धावा काढल्या. पण कमिन्सच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि भारताला पाचवा धक्का बसला. केदार जाधव फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला. केदारने १२ चेंडूत १० धावा केल्या. १५ चेंडूत २६ धावा करणारा विजय शंकर झेलबाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले.

ऑस्ट्रेलियातर्फे कमिन्सने ५ बळी घेतले.ऑस्ट्रेलियाची सुरूवात काहिशी खराब झाली कर्णधार फिंच भोपळा न फोडताच माघारी परतला.तसेच शॉन मार्श केवळ 6 धावा करून माघारी परतला त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 2 बाद 12 अशी झाली. त्यानंतर मात्र ख्वाजा आणि हॅण्डस्कॉम्ब यांनी 192 धावांची भागिदारी करून दावसंख्येला मोठा हातभार लावला.परंतु ख्वाजा 91 धावा करून माघारी परतला.त्यानंतर मॅक्सवेल देखील माघारी परतला. शतकवीर हॅण्डस्कॉम्ब देखील 117 धावांवर बाद झाला.त्यानंतर टर्नर आणि करी यांनी ऑस्ट्रेलियाच्या आशा जिवंत ठेवत ऑस्ट्रेलियाला विजयपथावर नेले.

First Published on: March 11, 2019 4:56 AM
Exit mobile version