Twitter Live Cricket Scorecard : भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी ट्विटरचे नवे फीचर

Twitter Live Cricket Scorecard : भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी ट्विटरचे नवे फीचर

क्रिकेटचा भारतातील मोठा चाहता वर्ग आहे. भारतातील ही क्रीडाप्रेमींची मोठी क्रेझ लक्षात घेऊनच ट्विटरने एक नवे फीचर लॉंच केले आहे. त्यामुळे क्रिकेड फॅन्सला प्रत्येक मिनिटाचे क्रिकेट अपडेट मिळणे शक्य होणार आहे. ट्विटरने मॅसेजिंग एपच्या माध्यमातून नवे फीचर लॉंच करत Twitter Live Cricket Scorecard उपलब्ध करून दिले आहे. भारतासाठीचे हे नवे फीचर ट्विटरने उपलब्ध करून दिले आहे.

या नव्या फीचरमुळे क्रिकेट प्रेमींना अद्ययावत स्कोअर पहायला मिळणार आहे. लाईव्ह असलेल्या मॅचेस या फीचरच्या माध्यमातून पाहता येतील. क्रिकेट सामन्यादरम्यान स्कोअरकार्ड हे एक्सप्लोअर टॅबमध्ये आणि लाईव्ह इव्हेंट्स पेजमध्ये पहायला मिळेल. तसेच क्रिकेट फॅन्सला स्कोअरदेखील फॉलो करता येणार आहे. रिअल टाईम पद्धतीने हा स्कोअर पाहता येईल. त्यामुळेच ट्विटरवरच हे सगळे अपडेट पाहता येतील. रिअल टाईम अशा पद्धतीने हा स्कोअर पाहता येईल.

हे फीचर ट्विटर इंडिया पेजवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अपडेटमध्ये लाईव्ह क्रिकेट स्कोअर पाहता येईल. तसेच खेळातील सर्व महत्वाचे अपडेट्सही यामधून मिळतील. हे अपडेट पाहण्यासाठी स्पोर्ट टॅबमध्ये क्लिक करून एक्सप्लोअर पेजवर क्लिक करावे लागेल. ट्विटरने एका व्हिडिओच्या माध्यमातून हे फीचर लॉंच केले आहे.

ट्विटरचे हे नवे फीचर ट्विटर इंडियाच्या लाईव्ह क्रिकेट स्कोअरकार्डच्या माध्यमातून आयओएस, वेबवर उपलब्ध असेल. एंड्रॉईड वापरकर्त्यांसाठी हे फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे. ट्विटरने पहिल्यांदाचा कम्युनिटी फीचरअंतर्गत हा पर्याय भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी देऊ केला आहे. भारतात बहुभाषीय अशा पद्धतीने हे फीचर देण्यात येईल. तसेच क्रिकेट ट्विटर ही भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी ही कम्युनिटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

फेसबुकच्या कम्युनिटी ग्रुप्ससारख्याच ट्विटरच्या कम्युनिटीही प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत याआधी हे कम्युनिटी फीचर वापरण्यात आले होते. पण पहिल्यांदा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हे फीचर देण्यात आले आहे. सध्या फक्त एंड्रॉईड मोबाईल ब्राऊजरवर हे फीचर आहे. तसेच आयओएसच्या माध्यमातूनही हे कम्युनिटी फीचर डायरेक्ट मॅसेजच्या माध्यमातून वापरता येईल. जगभरातून कोणालाही या कम्युनिटी फीचरसाठी आमंत्रित करता येईल.


हेही वाचा T20 World Cup 2021: ind vs pak जो संघ सामना जिंकेल, ५० टक्के…, इंझमाम उल हकची प्रतिक्रिया

First Published on: October 21, 2021 4:42 PM
Exit mobile version