भारत दौऱ्याला कोणी नकार देईल का ? ख्वाजाचे पाकिस्तान प्रेम उफाळून आले

भारत दौऱ्याला कोणी नकार देईल का ? ख्वाजाचे पाकिस्तान प्रेम उफाळून आले

ऑस्ट्रेलियाचा ओपनिंग बॅट्समन उस्मान ख्वाजाने न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा न करण्याच्या निर्णयावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. पण प्रतिक्रिया देताना उस्मान ख्वाजा भारताचा संदर्भ देत नव्या वादाला तोंड फोडले आहे. यामागे काही आर्थिक गणिते असू शकतात असाही अंदाज ख्वाजाने व्यक्त केला आहे. मूळचा पाकिस्तानच्या असलेल्या ख्वाजाने दोन्ही संघांच्या रद्द झालेल्या दौऱ्यामुळे प्रतिक्रिया दिली आहे. इतर देशातील खेळाडूंना आणि संस्थांना पाकिस्तान असल्यानेच नकार देणे अतिशय सोपे होते, कारण देश पाकिस्तान आहे, असेही ख्वाजा म्हणाला. ऑस्ट्रेलियन संघ अॅशेस मालिकेनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेशच्या बाबतीतही हीच गत होऊ शकते, पण भारताला मात्र कोणीही नाही म्हणणार नाही, असेही ख्वाजा म्हणाला.

भारतही पाकिस्तानसारख्या परिस्थितीत असला तरीही भारताच्या बाबतीत अस काही घडणार नाही. कारण पैसा बोलतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पाकिस्तानने वारंवार क्रिकेट खेळणे सुरक्षित असल्याचे दाखवून दिले आहे. पण पाकिस्तानातून एखादा संघ परतण्याचे काय कारण होते ? हे कळाले नाही असेही ख्वाजा म्हणाला. पाकिस्तानात खूपच सुरक्षा असल्याचेही त्याने स्पष्ट केले. आता लोक सुरक्षित असल्याचे एकायला मिळते. पीएसएलमध्येही चांगली सुरक्षा असल्याचे मत समोर आले आहे. पण गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आता नक्कीच परिस्थिती बदलली आहे हे मात्र नक्की.

काही दिवसांपूर्वी सामन्याच्या काही तास आधीच न्यूझीलंड संघाने पाकिस्तानातून दौऱ्यातून काढता पाय घेतला. त्यापाठोपाठच इंग्लंड संघानेही दौरा रद्द केला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डातून तसेच खेळाडूंकडून अतिशय जोरदार प्रतिक्रिया समोर आल्या. न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडने पुरूष आणि महिला असा दोन्ही संघांचा पाकिस्तानातील दौरा रद्द केला होता.


हेही वाचा – Pak Vs Eng : न्यूझीलंडसह इंग्लंडचाही पाकिस्तान दौरा रद्द, पीसीबीची आगपाखड


 

First Published on: September 24, 2021 5:29 PM
Exit mobile version