विराट कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे कमवणाऱ्यांच्या यादीत

विराट कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे कमवणाऱ्यांच्या यादीत

कर्णधार कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या धडाकेबाज खेळीमुळे जगभरात नाव कमावले आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला कर्णधार पद देण्यात आले आहे. विराट इन्स्टाग्रामवर देखील सक्रिय आहे. त्याला इन्स्टाग्रामवर ३ कोटी ८ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे विराट कोहली एका क्रिकेट सामन्यामध्ये जितके पैसे कमवतो त्याहीपेक्षा २२ पट पैसे इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमार्फत कमावत असल्याची माहिती ‘हॉपर एचक्यू’ या वेबसाईटने दिली आहे. विशेष म्हणजे इन्स्टाग्राम पोस्ट मार्फत सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या खेळाडूंच्या टॉप 10 मध्ये कोहलीचा नऊवा क्रमांक लागतो.

विराटच्या पोस्टने चाहते होतात प्रभावित

विराटच्या एका पोस्टवर लाखो फॉलोअर्स प्रभावित होतात. त्यामुळे त्याला इन्स्टाग्राम इंफ्लूएंसर्स असेही म्हणतात. विराट हा फॉलोअर्सला प्रभावित करणारा सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो. इन्स्टाग्राम पोस्टमार्फत सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोर्तुगालचा फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचा नंबर लागतो. त्यानंतर दुसरा क्रमांक ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आणि अर्जेंटीचा लागतो. तिसऱ्या स्थानावर फुटबॉलपटू मेस्सीचा नंबर लागतो. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे कमवणाऱ्या खेळाडूंच्या टॉप 10 यादीत विराट हा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे.


हेही वाचा – विराट कोहली इन्स्टाग्रामवर सर्वाधिक पैसे कमवणाऱ्यांच्या यादीत

First Published on: July 25, 2019 2:11 PM
Exit mobile version