Kohli vs Gambhir : सोशल मीडियावरही भिडले कोहली आणि गंभीर, विराटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Kohli vs Gambhir : सोशल मीडियावरही भिडले कोहली आणि गंभीर, विराटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आयपीएल २०२३च्या (IPL 2023) १६ हंगामात विराट कोहली आणि गौतम गंभीर (Kohli vs Gambhir) यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. दररोज विविध प्रकारचे अपडेट्स समोर येत आहेत. आरसीबी आणि लखनऊमधील (RCB Vs LSG) सामन्यानंतर कोहली आणि गंभीर यांच्यात वाद झाला होता. यावेळी लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक देखील मुख्य भूमिकेत होता. काल गौतम गंभीरने सोशल मीडियावरून विराट कोहलीवर टीका केली होती. आता विराट कोहलीने पुन्हा एकदा गौतम गंभीरवर पोस्ट करत निशाणा साधला आहे.

सोशल मीडियावर विराट कोहली आणि गौतम गंभीर सामन्याप्रमाणे आमनेसामने आले आहेत. राशिद खानने लखनऊच्या फलंदाजीदरम्यान सलामीवीर काइली मेयर्सचा उत्कृष्ट झेल घेतला तेव्हा कोहलीने पुन्हा एक पोस्ट शेअर केली. त्यानंतर गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहा लखनऊच्या गोलंदाजांना झोडपून काढत होता, तेव्हा कोहलीनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्याची प्रशंसा करणारी पोस्ट शेअर केली होती. आयपीएलमध्ये इतके सामने झाले पण कोहलीने अशा प्रकारची पोस्ट कधीही केली नव्हती. मात्र, यंदाच्या वेळेस पोस्ट केल्यामुळे त्याची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

गंभीर कोहलीला काय म्हणाला?

कोहलीने विनाकरण नवीन उल हकशी पंगा घेतला होता. सिराज आणि नवीन यांचे बोलणे संपले होते. पण त्यानंतर कोहली नवीनला भिडला होता. आपल्याला कोहलीने शिवी दिल्याचेही नवीनने म्हटले होते. ही सर्व गोष्ट घडल्यावर नवीन उल हक काही शांत बसलेला नाही. नवीन उल हकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. “लोकांशी तुम्हाला जसे वागायचे आहे तसे वागा. तुम्हाला ज्या पद्धतीने बोलायचे आहे, त्या पद्धतीने लोकांशी बोला.” असं नवीन म्हणाला होता. परंतु या पोस्टवर गंभीरने कमेंट करत कोहलीवर वार केला. यावेळी गंभीर म्हणाला की, ” जसा आहेस तसाच राहा, कधीच बदलू नकोस.” ही कमेंट करत असताना गंभीरने कोहलीला लक्ष्य केले होते.

दरम्यान, गौतम गंभीरच्या पोस्टला विराटने प्रत्युत्तर दिलं असून आता बीसीसीआय यामध्ये काही मध्यस्थी करणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : गौतम झाला पुन्हा ‘गंभीर’, विराटने बीसीसीआयला दिलेल्या पत्रानंतर वाद वाढण्याची शक्यता


 

First Published on: May 8, 2023 4:25 PM
Exit mobile version