Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा गौतम झाला पुन्हा 'गंभीर', विराटने बीसीसीआयला दिलेल्या पत्रानंतर वाद वाढण्याची शक्यता

गौतम झाला पुन्हा ‘गंभीर’, विराटने बीसीसीआयला दिलेल्या पत्रानंतर वाद वाढण्याची शक्यता

Subscribe

मागील काही दिवसांपासून भारतीय संघाचे क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील वाद मिटण्याचं नावच घेत नाहीये. आता पुन्हा एकदा गौतम गंभीरने विराट कोहलीवर वार केल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर विराट कोहलीने बीसीसीआयला एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्याने आपली काहीच चूक नसल्याचे म्हटले होते. परंतु या पत्रानंतरही गंभीरने त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

गंभीर कोहलीला काय म्हणाला?

- Advertisement -

कोहलीने विनाकरण नवीन उल हकशी पंगा घेतला होता. सिराज आणि नवीन यांचे बोलणे संपले होते. पण त्यानंतर कोहली नवीनला भिडला होता. आपल्याला कोहलीने शिवी दिल्याचेही नवीनने म्हटले होते. ही सर्व गोष्ट घडल्यावर नवीन उल हक काही शांत बसलेला नाही. नवीन उल हकने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. “लोकांशी तुम्हाला जसे वागायचे आहे तसे वागा. तुम्हाला ज्या पद्धतीने बोलायचे आहे, त्या पद्धतीने लोकांशी बोला.” असं नवीन म्हणाला होता. परंतु या पोस्टवर गंभीरने कमेंट करत कोहलीवर वार केला. यावेळी गंभीर म्हणाला की, ” जसा आहेस तसाच राहा, कधीच बदलू नकोस.” ही कमेंट करत असताना गंभीरने कोहलीला लक्ष्य केले आहे. त्यामुळे या टीकेवरून आता वाद चिघळण्याची शक्यता आहे.

लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सोमवारी म्हणजेच 1 मे रोजी झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. दोन्ही संघातील इतर खेळाडूंशी मध्यस्थी केल्यानं वाद वाढला नाही. आरसीबीने पहिल्यांदा ब‌ॅटिंग करताना 127 धावा केल्या होत्या. लखनऊच्या संघाचा खेळाडू बाद झाल्यानंतर विराट कोहली आक्रमकपणे जल्लोष करत होता. यामुळे गौतम गंभीरच्या रागाचा पारा चढला होता. मॅच संपल्यानंतर विराट कोहली सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता. यावेळी लखनौचा गोलंदाज नवीन उल-हक विराट कोहलीशी वाद घालताना दिसून आला. यावेळी ग्लेन मॅक्सवेलने वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर विराट कोहली तिथे आला आणि वाद वाढला.


- Advertisement -

हेही वाचा : विराट कोहली आणि गौतम गंभीर भरणार नाहीत दंड; सत्य जाणून बसेल धक्का


 

- Advertisment -