Ind vs NZ: विराटचा पारा चढला, पत्रकराला दिले खणखणीत उत्तर

Ind vs NZ: विराटचा पारा चढला, पत्रकराला दिले खणखणीत उत्तर

ind vs nz video virat kohli angry furious with question asked by journalist over his behaviour on field

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसऱ्यांदा व्हाईटशॉट दिला आहे. न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला आणि भारताला ७ धावांची आघाडी मिळाली. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन जेव्हा बाद झाला, तेव्हा विराट कोहलीने काहीशा वेगळ्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. विल्यमसन बाद झाल्यानंतर विराटने न्यूझीलंडच्या स्टेडियमधील चाहत्यांकडे बघूनही काही हावभाव करत आनंद साजरा केला. हा प्रकार तिथल्या एका पत्रकाराला खटकला. त्यामुळे याबाबत विराटला त्याने प्रश्न विचारला. मात्र त्यावर भर पत्रकार परिषदेत विराट चांगलाच भडकल्याचे दिसून आले आहे.

 

नक्की काय घडला प्रकार?

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन जेव्हा बाद झाला, तेव्हा विराटने निराळ्या पद्धतीने जल्लोष साजरा केला. तसेच चाहत्यांकडे बघूनही काही हावभाव केले. त्यावर एका पत्रकाराने विराटला फटकारत ”तू विचित्र हावभाव करून जल्लोष केलास. इतकेच नाही तर तू स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांकडे पाहून देखील हातवारे केलेस. भारताचा कर्णधार म्हणून तू असे न वागता मैदानावर चांगली वर्तणूक करून इतरांसमोर आदर्श ठेवला पाहिजे, असे तुला नाही वाटत का”? असा सवाल केला. त्यावर विराटने पत्रकाराला ‘तुला काय वाटतं’ असा प्रतिसवाल केला. तेव्हा पत्रकार म्हणाला ‘तू वर्तणूक सुधारून इतरांसमोर आदर्श ठेवायला हवा’. त्यावर विराट कोहली चांगलाच तापला आणि ‘मैदानावर नक्की काय घडलं ते तू नीट माहिती करून घे आणि मगच माझ्याकडे प्रश्न विचारायला ये. अर्ध्या माहितीवरून तू असे प्रश्न विचारू शकत नाहीस. आणि जर तू यातून मसालेदार बातमी शोधत असशील, तर ही जागा योग्य नाही. मी सामनाधिकाऱ्यांशी यावर चर्चा केली आहे. त्यांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नाही. धन्यवाद!’ अशा प्रकारचे उत्तर दिले.

First Published on: March 2, 2020 5:44 PM
Exit mobile version