दस हजारी कोहलीचा ‘विराट’ विक्रम

दस हजारी कोहलीचा ‘विराट’ विक्रम

विराट कोहलीचा विक्रम (सौ-Cricinfo)

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला की नवा विक्रम होत नाही असे फार कमी वेळा होते.  बुधवारी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ८१ धावांचा आकडा पार करताच नवा विक्रम प्रस्थापित केला.  एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोहली हा सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा फलंदाज ठरला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा

भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला की नवा विक्रम होत नाही असे फार कमी वेळा होते.  धावांचे ‘विराट’ मशीन ही क्रिकेट जगताने दिलेली उपाधी कोहलीने आपल्या जबरदस्त कामगिरीने पुन्हा सिद्ध करून दाखवली.  बुधवारी झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ८१ धावांचा आकडा पार करताच नवा विक्रम प्रस्थापित केला.  एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात कोहली हा सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा फलंदाज ठरला आहे. मैदानावर उतरल्यानंतर एखाद्या फलंदाजाला धावांची भूक किती मोठी असते हे कोहलीच्या ‘विराट’ कामगिरीवरून वेळोवेळी दिसून आले आहे.  १० हजारांचा टप्पा गाठताना दिल्लीकर कोहलीने ते पुन्हा एकदा सिद्ध केले.  ड्रेसिंग रुममधून मैदानावर पाय ठेवल्यानंतर कोहलीची बॅट विजेच्या चपळाईने तळपते.  मुख्य म्हणजे एका डावाचे शतकी खेळीत कसे रुपांतर करायचे याचा धडा विराट आपल्या सहकार्‍यांना तर देतोच;  पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज होऊ पाहणार्‍या युवा फलंदाजांनाही तो दीपस्तंभ ठरतो.  बुधवारची त्याची दस हजारी खेळी ही त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

सचिन तेंडुलकरला टाकले मागे 

कोहलीने भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत विक्रम साजरा केला.  सचिनला दहा हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी २६६ एकदिवसीय सामन्यांचे २५९ डाव खेळावे लागले होते.  तर कोहलीने अवघ्या २१३ सामन्यांच्या २०५ डावांत दहा हजार धावा केल्या आहेत.  कोहलीने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत ५९.६२ च्या सरासरीने १००७६ धावा केल्या आहेत.  ज्यात ३७ शतके आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.

दहा हजार धावांचा टप्पा पार पाचवा भारतीय  

एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार करणारा कोहली हा जगातील १३ वा तर भारताचा ५ वा फलंदाज आहे.  कोहलीआधी भारताकडून सचिन तेंडुलकर,  सौरव गांगुली,  राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी या महान फलंदाजांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा पराक्रम केला आहे.  मात्र या सामन्यात कोहलीने हा एकमेव विक्रम केला नाही.

यावर्षी १००० धावा पूर्ण 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात कोहलीने नाबाद १५७ धावांची अप्रतिम खेळी केली.  हे त्याचे मागील १४ एकदिवसीय डावांतील ७ वे शतक होते.  कोहलीने यावर्षी ११ सामन्यांच्या ११ डावांत १४९.४२ च्या सरासरीने १०४६ धावा केल्या आहेत.  ज्यात ५ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका वर्षात १००० धावांचा टप्पा पार करण्याची कोहलीची ही सहावी वेळ आहे.

तसेच याच सामन्यात ४८ धावा केल्यानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्‍या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले.  हा विक्रम करतानाही कोहलीने सचिनला  (१५७३ धावा)  मागे टाकले.  कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध २९ डावांमध्ये ७०.१६ च्या सरासरीने १६८४ धावा केल्या आहेत.  त्यामुळे कोहलीने एकाच सामन्यात ३ विक्रम करण्याचा नवा विक्रम केला आहे.

First Published on: October 25, 2018 5:00 AM
Exit mobile version