T20 WC 2021मध्ये बाबर आजमकडून हुकला रेकॉर्ड, काय आहे कोहलीचा खास रेकॉर्ड?

T20 WC 2021मध्ये बाबर आजमकडून हुकला रेकॉर्ड, काय आहे कोहलीचा खास रेकॉर्ड?

T20 WC 2021मध्ये बाबर आजमकडून हुकला रेकॉर्ड, काय आहे कोहलीचा खास रेकॉर्ड?

टी-२० विश्वचषक २०२१चा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्सनी विजय मिळवत पहिल्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. टी-२० विश्वचषकाच्या सातव्या मोसमामध्ये सर्वात जास्त धावा करण्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम पहिल्या नंबरवर कायम आहे. परंतु संपूर्ण टी-२० विश्वचषकाच्या एका मोसमामध्ये सर्वात जास्त धावा करण्यामध्ये विराट कोहली पहिल्या नंबर कायम आहे. यावर्षी कोणीही विराट कोहलीचा रेकॉर्ड मोडू शकले नाही, पण बाबर आजम हा त्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.

टी-२० विश्वचषकाच्या एका मोसमामध्ये सर्वात जास्त धावा करण्यामध्ये विराट कोहली पहिल्या नंबरवर आहे. हा रेकॉर्ड विराट कोहलीने २०१४ साली केला होता. ६ सामन्यात १०६.३३च्या सरासरीने ३१९ धावा केल्या होत्या. या मोसमामध्ये त्याने ४ अर्धशतक केली होती, तर बेस्ट स्कोअर ७७ धावा होत्या. आता २०२१मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजमने चांगली फलंदाजी करत ६ सामन्यात ६०.६०च्या सरासरीने एकूण ३०३ धावा केल्या. यात बाबरने ४ अर्धशतक केली आणि त्याच्यातील बेस्ट स्कोअर ७० धावा होत्या. त्यामुळे बाबर टी-२० विश्वचषक २०२१मध्ये विराट कोहलीच्या रेकॉर्डच्या जवळ पोहोचला होता, परंतु तो कोहलीच्या पुढे जाऊ शकला नाही.

टी-२० विश्वचषकात एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप फलंदाज

यंदाच्या सामन्यात कोहलीची निराशाजनक खेळी

दरम्यान टी-२० विश्वचषक २०२१ या मोसमामध्ये विराट कोहलीचे प्रदर्शन निराशाजनक होते. यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या ५ सामन्यात फक्त ६८ धावा विराट कोहलीने केल्या. यंदाच्या सीझनमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज के.एल राहुल ठरला. ज्याने ५ सामन्यात ३ अर्धशतक करून १९४ धावा केल्या. तर रोहित शर्माने ५ सामन्यात २ अर्धशतक पूर्ण करून १७४ धावा केल्या.


हेही वाचा – ICC best playing XI : आयसीसीची बेस्ट प्लेइंग इलेव्हन, कोणत्या खेळाडूंना स्थान ?


First Published on: November 15, 2021 6:54 PM
Exit mobile version