गुलाबी चेंडूच्या खेळातही कोहलीची विराट कामगिरी

गुलाबी चेंडूच्या खेळातही कोहलीची विराट कामगिरी

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील डे- नाइट कसोटीचा दुसरा दिवस कर्णधार विराट कोहलीने गाजवला. कोहलीने शतकी 136 धावांची शतकी खेळी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 27 वे शतक ठरले आहे. कोहलीला अजिंक्य रहाणेने अर्धशतकी (51) खेळी करताना चांगली साथ दिली. परंतु, कोहली माघारी परतल्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यानंतर भारताने आपला डाव 9 गडी बाद 347 धावांवर घोषित केला.त्यानंतर दुसरा डाव खेळायला आलेल्या बांगलादेशची घसरगुंडी…अशी उडाली.

त्याआधी बांगलादेशच्या गोलंदाजांनी टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना गुंडाळले. भारताने डाव घोषित करून पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली आहे. कामगिरीशी बरोबरी कर्णधार विराट कोहलीने ऐतिहासिक कसोटी सामन्यात शतकी खेळी करत भारताची बाजू मजबूत केली आहे. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेताना विराटने आपले कसोटी कारकिर्दीतील २७ वे शतक झळकावले. अजिंक्य-पुजाराची अर्धशतके आणि विराटचे शतक या जोरावर भारताने आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे.

या शतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २७ शतके झळकावण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे हे ४१ वे शतक ठरले या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे.

दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. विराटने १९४ चेंडूत १८ चौकारांसह १३६ धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने दिवस-रात्र कसोटीच्या इतिहासात एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रुटच्या दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. जो रुटने २०१७ साली दिवस-रात्र कसोटीत १३६ धावा केल्या होत्या. विराटने आज या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथचा १३० धावांचा विक्रम मोडला.

First Published on: November 24, 2019 5:31 AM
Exit mobile version