वॉर्नर, स्मिथ खून करून निर्दोष सुटले !

वॉर्नर, स्मिथ खून करून निर्दोष सुटले !

- कर्टली अँब्रोस

ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ हे खून करून निर्दोष सुटले आणि त्यांना १ वर्ष नाही तर २ वर्षांची बंदी घालायला पाहिजे होती, असे मत वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज कर्टली अँब्रोसने व्यक्त केले आहे. मागील वर्षी मार्चमध्ये द.आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे तेव्हाचा कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती.

हे दोघे सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यांच्या बंदीचा कालावधी संपला असल्याने आयपीएलनंतर होणार्‍या विश्वचषकासाठी या दोघांची ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड होण्याची शक्यता आहे. पण, अँब्रोसच्या मते या दोघांवर अजून एका वर्षाची बंदी असायला हवी.

तुम्ही जेव्हा अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करता, तेव्हा तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी खरे सांगू तर ते खून करून निर्दोष सुटले. यासाठी एका वर्षाची बंदी ही खूपच कमी आहे. या दोघांनी केलेल्या मूर्खपणाबद्दल त्यांच्यावर २ वर्षांची बंदी घालायला पाहिजे होते, जेणेकरून इतरांना धडा मिळेल, असे अँब्रोस म्हणाला.

तसेच या दोन चांगल्या खेळाडूंची विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड होईल अशी अँब्रोसला आशा आहे. तो म्हणाला, मला वाटत नाही की पुन्हा अशी चूक करतील. मला आशा आहे की, ऑस्ट्रेलियन चाहते त्यांना पाठिंबा देतील आणि या दोघांची विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड होईल. कारण या दोघांमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अधिक मजबूत होईल.

First Published on: April 12, 2019 4:54 AM
Exit mobile version