‘या’ खेळाडूसाठी गाढवाला बाप म्हणावं लागलं, तर मी तेही करेन; ‘पाक’च्या पराभवावर वसीम अक्रम संतापला

‘या’ खेळाडूसाठी गाढवाला बाप म्हणावं लागलं, तर मी तेही करेन; ‘पाक’च्या पराभवावर वसीम अक्रम संतापला

टी-20 विश्वचषकातील पहिले दोन सामने पाकिस्तानने गमावले. दोन सामन्यातील पराभवामुळे पाकिस्तानचा विश्वचषकातील पुढील प्रवास कठीण झाला आहे. शिवाय, या दोन पराभवांनंतर पाकिस्तानचे अनेक माजी क्रिकेटपटू कर्णधार बाबर आझमवर जोरदार टीका करत आहेत. तसेच, पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम यानेही बाबर आझमवर टीका केली असून, त्याच्या टीकेची सध्या क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. (wasim akram shoaib malik babar zimbabwe t20 world cup)

पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने बाबर आझमचे काही निर्णय अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले. ए स्पोर्ट्स चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान वसीम अक्रमने टीका केली. “नियोजनासाठी सर्वांना एकत्र बसावे लागेल. पाकिस्तानची मधली फळी फारशी चांगली नाही आणि गेल्या एक वर्षापासून ही गोष्ट केली जात आहे. आता शोएब मलिकसारखा खेळाडू बाहेर बसला आहे. आता जर मी पाकिस्तानचा कर्णधार असतो तर माझे ध्येय संघासाठी कोणत्याही प्रकारे विजेतेपद मिळवणे हे असेल. यासाठी जर मला गाढवाचा बाप करावा लागला तर मी तेही करेन. मी कर्णधार असतो तर, कर्णधार म्हणून शोएब मलिकला संघात घेण्यासाठी संघ निवडकर्त्याशी भांडलो असतो, नाहीतर मी कर्णधार पद सोडले असते”, असे वसीम अक्रम म्हणाला.

वसीम अक्रम बाबर आझमबद्दल बोलत असताना टीव्ही अँकरने त्याला विचारले की बाबर आझमला त्याच्या आवडीची टीम का मिळाली नाही असे तुम्हाला वाटते. याला उत्तर देताना वसीम अक्रम म्हणाला की तो अधिक हुशार होण्याची गरज आहे, कारण हा कोणत्याही भागातील संघ नाही की तुमच्या ओळखीचे लोक तुमच्या संघात यावे किंवा जर तो माझा मित्र असेल तर तो माझ्या संघात खेळेल. मी पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असतो तर शोएब मलिकला मधल्या फळीत स्थान दिले असते, असेही तो म्हणाला.


हेही वाचा – टी-20 विश्वचषकावर पावसाचे सावट; आजचे दोन्ही सामने रद्द

First Published on: October 28, 2022 9:22 PM
Exit mobile version