घरक्रीडाटी-20 विश्वचषकावर पावसाचे सावट; आजचे दोन्ही सामने रद्द

टी-20 विश्वचषकावर पावसाचे सावट; आजचे दोन्ही सामने रद्द

Subscribe

टी-20 विश्वचषकातील दोन्ही गटातील सामने रंगतदार होत आहेत. एकिकडे प्रत्येक संघ गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघांनाच पुढील सामन्यात म्हणजेच उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे.

टी-20 विश्वचषकातील दोन्ही गटातील सामने रंगतदार होत आहेत. एकिकडे प्रत्येक संघ गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी सामना जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. कारण गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघांनाच पुढील सामन्यात म्हणजेच उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार आहे. मात्र, सध्या टी-20 विश्वचषकावर पावसाचे सावट असल्याने खेळाडूंची चिंता वाढत आहे. सामना जिंकण्यासाठी केलेला सराव आणि आखलेली रणनिती पावसामुळे पाण्यात जात आहे. कारण पावसामुळे सामना रद्द होत असून, दोन्ही संघाना केवळ 1-1 गुण मिळत आहे. अशातच टी-20 विश्वचषकातील आजचे दोन सामने रद्द झाले आहेत. (Due To Heavy Rainfall Two Match of T20 World Cup Canceled)

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अ गटातील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे दोन सामने रंगणार होते. पण मेलबर्नमध्ये होणाऱ्या तुफान पावसामुळे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे आज एकही विश्वचषकाचा सामना खेळवला गेला नाही. त्यात साखळी सामन्यांसाठी अधिकचा दिवस नसल्याने सामना रद्द झालेल्या संघाना 1-1 गुण देण्यात आला आहे.

- Advertisement -

आज दोन सामने रद्द झाल्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि अफगाणिस्तान या 4 ही संघाना 1-1 गुण देण्यात आला. दरम्यान, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून मोठे उलटफेर होताना दिसत आहेत. आयर्लंड संघाने बलाढ्य इंग्लंड संघाला मात दिल्यानंतर गुरुवारी झालेल्या झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अवघ्या एका धावेने झिम्बाब्वेने पाकिस्तानला मात दिली.

ज्यानंतर आर अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसेच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार होता. आधी अफगाणिस्तान-आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला. ज्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हा सामना दोन्ही संघासाठी सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दोघांनाही यंदा नावाला साजेशी कामगिरी करता न आल्याने आज विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत वरचढ होणार होता. पण सामनाच रद्द झाल्याने दोघांना 1-1 गुण देण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानचे टी-20 विश्वचषकातील भविष्य भारताच्या हाती; वाचा नेमके कसे?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -