महिला प्रीमियर लीग : पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी, गुजरात जायंट्सचा पराभव

महिला प्रीमियर लीग : पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी, गुजरात जायंट्सचा पराभव

मुंबई : महिला प्रीमियर लीग (डब्लुपीएल २०२३) चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये काल, शनिवारी पार पडला. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा तब्बल १४३ धावांनी पराभव केला.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारीत २० षटकात 5 विकेट गमावत २०७ धावा केल्या. या धावांच्या प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सने १५.१ षटकात सर्वबाद ६४ धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सची फलंदाजीच नाही तर गोलंदाजीही अप्रतिम होती. मुंबई इंडियन्सच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ३ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ…

1. हरमनप्रीत कौर
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करताना संघाची धावसंख्या २०७ पर्यंत पोहचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले. हरमनप्रीतने ३० चेंडूचा सामना करताना ६५ धावांची खेळी केली. यामध्ये तिने १४ चौकार मारले. यावेळी तिचा स्ट्राईट रेट २१६.६६ इतका होता.

2. हेली मैथ्यूज
सलामीवीर फलंदाज हेली मैथ्यूज हिने मुंबई इंडियन्सच्या विजयात आपल्या फलंदाजीने महत्त्वाचे योगदान दिले. मैथ्यूजने ३१ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट १५१.६१ इतका होता.

3.अमीलिया कर
अमेलिया केर फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. तिने फलंदाजी करताना २४ चेंडूत ६ चौकार आणि १ षटकारांच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट १८७.५० इतका होता. तर गोलंदाजीमध्ये तिने २ षटकात १ निर्धाव षटक टाकताना १२ धावा देत २ विकेट घेतल्या.

आजचा सामना
आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सामना होणार आहे. या सामन्यात भारताची स्मृती मंधाना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची कर्णधार, तर ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग दिल्ली कॅपिटल्सची कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

First Published on: March 5, 2023 10:32 AM
Exit mobile version