भालाफेकीत अन्नू राणी आठव्या स्थानी

भालाफेकीत अन्नू राणी आठव्या स्थानी

अन्नू राणी

भारताची आघाडीची भालाफेक खेळाडू अन्नू राणीला जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे १२ खेळाडूंचा समावेश असलेल्या अंतिम फेरीत तिला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

अन्नूने अंतिम फेरीची उत्तम सुरुवात केली. तिने पहिल्या प्रयत्नात ५९.२५ मीटर लांब भाला फेकत पाचवे स्थान मिळवले. दुसर्‍या प्रयत्नात तिने कामगिरीत सुधारणा केली. तिने ६१.१२ मीटर अंतर भालाफेक केला. मात्र, तिची दोन स्थानांची घसरण झाली आणि ती सातव्या स्थानी गेली.

चौथ्या प्रयत्नात तिने ६०.४० मीटरचे अंतर नोंदवले. त्यानंतर तिची कामगिरी खालावली. ६१.१२ मीटरच्या सर्वोत्तम अंतरामुळे तिचा आठवा क्रमांक आला. त्याआधी झालेल्या प्राथमिक फेरीत अन्नूने ६२.४२ मीटर लांब भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केला होता.

भालाफेकीच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या केल्सी-ली बार्बरने ६६.५६ मीटरचे अंतर नोंदवत सुवर्णपदक पटकावले. चीनच्या शियिंग लिऊ आणि हुईहुई ल्यू यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक मिळवले.

First Published on: October 3, 2019 5:53 AM
Exit mobile version