आवारे उपांत्य फेरीत , दिपकही चमकला

आवारे उपांत्य फेरीत , दिपकही चमकला

आवारे

येथे सुरू असलेल्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा आघाडीचा मल्ल राहुल आवारेने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आवारेने ६१ किलो वजनी गटात ही कामगिरी केली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाय मिळालेल्या राहुल आवारेने तुर्कमेनिस्तानच्या केरीम होजाकोला हरवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याने होजाकोलावर आधारावर १३-२ ने सहज मात दिली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत आवारेने कझाकिस्तानच्या रासुल कालियेवरा १०-७ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत आवारेचा सामना जॉर्जियाच्या बेको लोमताड्झेशी होणार आहे.

तर दुसरीकडे, ८६ किलो वजनी गटात भारताच्या दिपक पुनियाने जबरदस्त कामगिरी करत कोलंबियाच्या कार्लोस इज्किर्डोला ७-६ ने हरवले. त्यामुळे पुनीया देखील उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. पुनियाचा सामना उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या स्टेफन रीचमुथशी होणार आहे.याआधी ७९ किलो वजनी गटात भारताच्या जितेंद्रने विजयी आरंभ केला होता. त्याने पहिल्या फेरीत मोल्डोवाच्या घेओरघी पास्कलोवला ७-२ ने धूळ चारली होती मात्र, उपांत्यपूर्व फेरीत जितेंद्रला स्लोव्हाकिआच्या ताजमुराझ सालकाझानोवने ४-० असे हरवले.

पुनियाचा ऑलिम्पिक प्रवेश

पुनियाने हा विजय संपादन करताना ८६ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत विजय मिळवला आणि टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकिट मिळवले. या विजयासह तो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

First Published on: September 22, 2019 5:17 AM
Exit mobile version