PAK vs ZIM : झिम्बाब्वेचे कमालीचे क्षेत्ररक्षण; 1 रनने मिळवला पाकिस्तानवर विजय

PAK vs ZIM : झिम्बाब्वेचे कमालीचे क्षेत्ररक्षण; 1 रनने मिळवला पाकिस्तानवर विजय

टी-20 विश्वचषकातील आजचा सामना पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात झाला. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करून पाकिस्तानला 131 धावांचे आव्हानात्मक आव्हान ठेवले. मात्र 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या खेळाडूंना खूप धडपड करवी लागली. अखेर झिम्बाब्वेने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानवर धमाकेदार विजय मिळवला आणि इतिहास रचला. (Zimbabwe beat Pakistan by 1 run in T20 World Cup 2022)

या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेकडून कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. शॉन विल्यम्सने सर्वाधिक 31 धावा केल्या, मात्र त्याच्याशिवाय कोणत्याच फलंदाजाला जास्त धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर झिम्बाब्वेचा टिकाव लागला नाही. मात्र तरीही झिम्बाब्वेने 20 षटकांत 8 बाद 130 धावा करून पाकिस्तानला विजयासाठी 131 धावांचे आव्हान दिले.

झिम्बाब्वेने दिलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला अखेरच्या 9 चेंडूत 18 धावांची गरज होती. अशातच मोहम्मद नवाजने एक शानदार षटकार ठोकला. त्यानंतर 8 चेंडूत 12 धावांची गरज असताना नवाजने एक धाव काढून मोहम्मद वसीमला स्ट्राईक दिले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. झिम्बाब्वेकडून शेवटचे षटक ब्रॅड इव्हान्सने टाकले. हे षटक ब्रॅड इव्हान्सने अत्यंत सावधानतेने आणि विजयांच्या दृष्टीने टाकल्याचे पाहायला मिळाले.

ब्रॅड इव्हान्सचे शेवटचे षटक

पाकिस्तानकडून मोहम्मद वसीमने सर्वाधिक 44 धावा केल्या. पाकिस्तानला देखील सुरूवातीपासून मोठे झटके बसले. मोहम्मद रिझवान (14), कर्णधार बाबर आझम (4), शान मसूद (44), इफ्तिखार अहमद (5), शादाब खान (17) आणि हैदर अली (0) धावा करून बाद झाला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 3 बळी पटकावले. तर ब्लेसिंग मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स आणि ल्यूक जोंगवे यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.

पाकिस्तानचा संघ :

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, हैदर अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफ, नसीम शाह.


हेही वाचा – IND vs NED : दुसऱ्या विजयासह टी-20 विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी

First Published on: October 27, 2022 9:40 PM
Exit mobile version