आंधळी कोशिंबीर खेळताना चिमुकली चौथ्या मजल्यावरून पडली; डोक्याला जबर मार, मृत्यूशी झुंज सुरू

आंधळी कोशिंबीर खेळताना चिमुकली चौथ्या मजल्यावरून पडली; डोक्याला जबर मार, मृत्यूशी झुंज सुरू

ठाणे – गेल्या शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंब्रा येथील किस्मत कॉलनी परिसरातील ठाकूर बिल्डिंगमध्ये खेळत असताना चौथ्या माळ्यावरून पडलेली सात वर्षीय मुलगी सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ही वेळ तिच्यावर या इमारत विकासकाच्या चुकीमुळे आल्याचा आरोप स्थानिक रहिवासीयांनी केला आहे.

हेही वाचा – ठाण्यात नवरात्रौत्सव मंडळाचे मंडप भाडेही माफ होणार; आयुक्तांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शुक्रवारी १७ सप्टेंबर रोजी रात्री मुंब्रा येथील किस्मत कॉलनी परिसरातील ठाकूर बिल्डिंगमध्ये चौथ्या माळ्यावर राहणारी जिकरा अन्सारी (7) ही मुलगी इमारतीच्या मुलाबरोबर गॅलरीमध्ये खेळत होती. मुले डोळ्याला पट्टी बांधून “आंधळी कोशिंबीर” हा खेळ खेळत होते. जीकरा पट्टी बांधल्यावर पलंगावर चढली. विकासकाने या इमारतीचे बांधकाम करताना घरातील हॉलमधील खिडकीला लोखंडी ग्रील व काचेची स्लायडिंग न लावल्याने ही मुलगी खिडकीतून थेट खाली पडली. बेशुद्ध अवस्थेत या मुलीला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र ती सध्या व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती खूप नाजूक झाली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यूशी झुंज देत आहे.

या मुलीचे आई वडील दोन महिन्यांपूर्वी गावावरून भाड्याने राहायला आले आहेत. या विकासकाने त्यांच्याकडून 30 हजार रुपये अनामत रक्कम व 4 हजार रुपये भाडे घेतले आहे. ते अनामत रक्कम परत मागत असताना विकासक ते परत देत नसल्याचे तिच्या आईचे म्हणने आहे, मुलीची प्रकृती नाजूक झाल्याने ती हबकून गेली आहे.

हेही वाचा एसटीच्या ताफ्यात लवकरच १५० सीएनजी बसेस; प्रदूषण रोखण्यास लागले हातभार

मात्र या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या विकासकाविरोधात मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप मुंब्र्यातील समाजसेवक हाशिम शेख यांनी केला आहे.

First Published on: September 20, 2022 4:32 PM
Exit mobile version