सार्वजनिक गणेशोत्सवासाठी भिवंडी महापालिका सज्ज, पोलिसांकडूनही सूचना

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी भिवंडी महापालिका सज्ज, पोलिसांकडूनही सूचना

भिवंडी – भिवंडी शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सोहळा अत्यंत आनंदाने, उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी भिवंडी महानगरपालिका पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे. यासाठी आज नियोजन आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी भिवंडी महानगरपालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही बैठक महानगरपालिकेच्या मा. प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशाप्रमाणे महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली.

हेही वाचा – डोंबिवली एमआयडीसीत इमर्जन्सी कंट्रोल व्हॅन, रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण,सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई व त्यांचे पदाधिकारी, महानगरपालिका अधिकारी ,वाहतूक व पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले सु.द.वडके आणि पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक टोरंट पाॅवर चे व संबंधित अधिकारी हजर होते.

कोरोना महामारीच्या दरम्यान निर्बंधामुळे आपण गेली दोन वर्ष कोणतेच सण, उत्सव साजरे करू शकलो नाही. परंतु महाराष्ट्र शासनाने केलेल्या घोषणा व सूचनेनुसार यंदा दहीहंडी प्रमाणेच सार्वजनिक गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील स्वच्छता, रस्ते, औषध फवारणी, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व दुरुस्ती अतिक्रमणे हटवणे, सर्व विसर्जन घाटावरील स्वच्छता, जीवन सुरक्षा संदर्भात बोटी विसर्जनासाठी प्लॅटफॉर्म, जीवन सुरक्षा रक्षक नियुक्ती, झाडाच्या फांद्याचा छाटणे इत्यादी विविध कामांचा आढावा घेण्यात आला. तसेच, तातडीने सर्व विसर्जन घाटांवर संयुक्तपणे भेट देऊन महानगरपालिकेकडील सर्व सोयी सुविधा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा – बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न, मनसेकडून केडीएमसी आयुक्तांना पत्र

उपायुक्त झिंजाड पुढे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नसल्याने यंदा भिवंडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अगदी मोफत मंडप उभारता येणार आहेत. परंतु सर्व गणेश मंडळांना मंडप परवानगी घेणे बंधनकारक व अनिवार्य राहील. त्यासाठीच्या महानगरपालिका, पोलीस प्रशासन व वाहतूक पोलीस यांच्या परवानगीकरिता महानगरपालिकेमध्ये व प्रभाग समिती स्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार असल्याने या परवानग्या मिळण्यास गणेशोत्सव मंडळांना मार्ग सुकर होणार आहे. यासाठी महानगरपालिकेने गणेश मंडळांसाठी http://smartbncmc.com/pandal/च्या साइटवर ऑनलाइन व प्रभाग समिती स्तरावर ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परवानगीसाठी रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधांचा लाभ गणेश मंडळांनी घ्यावा असे उपायुक्त झिंजाड म्हणाले.

याप्रसंगी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी म्हणाले की, यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या अप्रिय घटना घडता कामा नये. यासाठी सर्व पोलीस यंत्रणांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या अत्यंत काळजीपूर्वक पार पाडून पोलीस अधिकारी व महानगरपालिका अधिकारी यांनी योग्य तो समन्वय राखून कायदा व सुव्यवस्था राखावी आणि हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अत्यंत काटेकोरपणे आपापली भूमिका पार पाडावी. या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसंगी संबंधितांवर कोणतीही हयगय न करता कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी उपस्थितांना दिले तसेच यादरम्यान शहरांमध्ये विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्याच्या सूचनाही टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुचना दिल्या आहेत.

सदर आढावा बैठकीसाठी मुख्य लेखापरीक्षक श्रीकांत अनारसे, मुख्य लेखा वित्त अधिकारी किरण तायडे, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे, सहाय्यक आयुक्त प्रशासन नितीन पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुशरा शेख, प्रभाग अधिकारी रमेश थोरात, बाळाराम जाधव, फैसल तातली, दिलीप खाने सुनील भोईर व संबंधित महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख, पोलीस अधिकारी, टोरंट पॉवरचे अधिकारी उपस्थित होते.

First Published on: August 23, 2022 6:11 PM
Exit mobile version