नोटीस बजावूनही राजन विचारे, केदार दिघे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित, शिंदे म्हणाले…

नोटीस बजावूनही राजन विचारे, केदार दिघे ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित, शिंदे म्हणाले…

धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, ठाकरे गटातील राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. (Despite serving notice, Rajan vichare, Kedar Dighe attends flag hoisting program, Shinde said…)

हेही वाचा – मध्यरात्री ध्वजारोहण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जपली ठाण्यातील 40 वर्षांपूर्वीची परंपरा

ठाकरे गटातील राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र, त्यानतंरही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे काहीवेळ येथे वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.


ध्वजारोहण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, “पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचे आहे, त्यांना येऊ द्या असे सांगितले होते”, असे शिंदे यांनी म्हटले.

हेही वाचा – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘नौपाडा रक्षक’ अभियान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

“भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. त्यांना अभिवादन करतो. ठाण्यात आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला”, असेही ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

First Published on: August 15, 2022 6:33 PM
Exit mobile version