#MeToo चेतन भगतने फेटाळले आरोप, सादर केला पुरावा

#MeToo चेतन भगतने फेटाळले आरोप, सादर केला पुरावा

प्रातिनिधिक फोटो

लैंगिक छळाचा आरोप लागल्यानंतर आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत याने आरोप करणाऱ्या महिलेचे आरोप फेटाळत. एक ई- मेल आपल्या ट्विटर अकाऊंटहून शेअर केला आहे. भगत याने आज सकाळी काही ट्विट केलेत आणि #metoo मोहीम घाणेरडी असल्याचे म्हटले आहे. स्वत:वर लागलेल्या आरोपाचे खंडन करत भगत यांनी ज्या ई-मेल आयडीवरुन त्याला मेल आला. स्क्रिन शॉट शेअर केला आहे. यात शेवटी ‘मिस यू आणि किस यू’ लिहिले आहे. त्यामुळे आता या घटनेला वेगळीच दिशा मिळाली आहे.

वाचा- #MeToo च्या निमित्ताने ही दुसरी बाजू

काय आहे हे ट्विट ?

आरोपाचे खंडन करत चेतन भगतने म्हटले की,”तर कोण कोणाला किस करण्याचा  प्रयत्न करत आहे? इरा त्रिवेदीकडून २०१३ मध्ये आलेल्या ई- मेल मधून आणि विशेषतः शेवटच्या ओळीमधून सत्य समोर येत आहे. यावरुन २०१० मध्ये लावलेले आरोप खोटे आहे. हे त्यांनाही माहिती आहे. चुकीच्या आरोपामुळे मला आणि माझ्या कुटुंबाचा मानसिक छळ होत आहे हे थांबवले पाहिजे. चुकीचे आरोप लावून या मोहिमेला खराब नका करु.”

वाचा- #MeToo : ‘सलमान खाननं माझा लैंगिक छळ केला’

हे प्रतिष्ठा मलीन करण्याचे काम

“व्यक्तीची प्रतिष्ठाच त्याच्यासाठी अमूल्य असते. जी जीवंत असे पर्यंत त्याच्या कामी येते. माझ्यावर खोटे आरोप लावणे ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट एका व्यक्तीला कमजोर करु शकते.” असे देखील चेतन याने म्हटले आहे.

वाचा-#MeToo नाना पाटेकर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल

काय होते प्रकरण ? 

लेखक चेतन भगत यांच्यावर एका महिलेने त्रास देण्याचा आरोप केला होता. #metoo मोहीमेअंतर्गत या दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅपवरील संवादाचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर पोस्ट केले. यावर प्रतिक्रिया देताना चेतन भगत यांनी फेसबुक पोस्टद्वारे संबधीत महिलेशी माफी मागितली होती.

First Published on: October 15, 2018 3:01 PM
Exit mobile version