घरफिचर्स#MeToo च्या निमित्ताने ही दुसरी बाजू

#MeToo च्या निमित्ताने ही दुसरी बाजू

Subscribe

भारतात सध्या #MeToo Movement ची लाट आलीये. दरदिवशी चार-दोन लोकांवर आरोप लावले जात आहेत. मात्र मी टू पणाची दुसरी बाजू देखील आहे. ब्लॉगर कविता लाखे यांनी सध्याच्या वातावरणावर परखड मत व्यक्त केलंय.

ब्लॉगर कविता लाखे यांनी सध्या भारतात जोर पकडत असलेल्या #MeToo Movement बद्दल काही निरीक्षणे नोंदवली आहेत. काही पुरुषांवर आरोप झाले म्हणजे सर्वच पुरुष तसे आहेत का? ‘सब घोडे बारा टके’ हा न्याय लावता येईल का? असे काही मूलभूत प्रश्न लाखे यांनी आपल्य ब्लॉगमध्ये सविस्तर मांडले आहेत. त्यांचा हा संपुर्ण ब्लॉग खास मायमहानगरच्या वाचकांसाठी….


 

- Advertisement -

‘#MeToo है ना बराबर है. ये सब जेन्टस् है ना एक नंबर के कुत्ते और कमीने होते है. इनके साथ ना ऐसा ही होना चाहीए. मेरे मॉमने तो मेरे दीदी को सिधा बोला है. हजबंड ज्यादा रुबाब मारणे लगे ना तो जा सीधा ठोक दे एनसी. फिर देख कैसे लाईन पे आता है.’ ट्रेनमध्ये माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या कॉलेज तरुणींमधला हा संवाद कानावर पडला आणि माझं पुस्तक वाचण्यातून लक्षच उडालं. पुस्तक बंद करुन बॅगमध्ये ठेवलं आणि त्याचं बोलणं लक्ष देऊन ऐकू लागले.

‘आज के लाईफ मे ना ऐसाही रहना पडता है. मेरे बी एफ को भी मैने कंट्रोल मे रखा है. उसको बताया है मैंने. अगर छोड के जायेगा ना तो देख तेरे सारे एसएमएस है मेरे पास. वाट लगा दूंगी तेरी. समजा ना. बहोत डरता है मुझसे. मै बोलू वो करता है…’ तरुणीच्या या बोलण्यावर तिच्या मैत्रिणी खळाळून हसल्या. सगळ्याजणी एकाच सुरात you are right असं तिला म्हणाल्या. हे जे काही चाललं होतं ते मला सहनंच झालं नाही. यामुळे मी मध्येच बोलले. dear its not right its wrong. तशी ती तरुणी व तिच्या मैत्रिणी माझ्याकडे विचित्र नजरेने बघू लागल्या. तिने मला म्हटलं. its none of your business mam. मी पट्कन म्हटलं. its my business. your are telling wrong ways to get what you want . तशी ती तरुणी माझ्यावरच चिडली. आपको क्या करना है. आप आपका काम किजिए. असं बोलून त्या दरवाज्याजवळ जाऊन उभ्या राहिल्या. माझ्याकडे बघून त्या बऱ्याचवेळ फिदी फिदी हसतही होत्या. माझ लक्ष त्यांच्या गळ्यात अडकवलेल्या आयडीवर गेलं. मुंबईतील नामांकित कॉलेजच्या विद्यार्थीनी होत्या. पण या नक्की काय शिकताहेत. हा प्रश्न मनात आलाच.

- Advertisement -

अठरा एकोणीस वर्षाच्या मुली होत्या त्या. काय अनुभव असेल यांना पुरूषांचा. किती ओळखलं असेल यांनी पुरुषांना. पण तरीही त्यांच्या मनात पुरुषांबद्दल इतकी कटुता. #MeToo च्या लाटेनंतर त्यांच्या कटुतेत भरच पडल्यासाऱखी वाटली. अमेरिकेतनं आलेल्या या #MeToo चळवळीने देशात आगचं लावली आहे. रोज एक दोन महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची पोस्ट टाकत आहेत. चांगल आहे. #MeTooच्या निमित्ताने महिलांना त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी हक्काच व्यासपीठ मिळालयं. इतकी वर्ष मनात धुसमसणाऱ्या वादळाला #MeToo ने बाहेर काढल्याने बऱ्यापैकी मोकळ्या झाल्या असतील त्या. हिंमत लागते याला. hats off to all my friends. पण तरीही मनात एक प्रश्न राहून राहून येतो. हे जे काही चाललं आहे. ते जरा एकांगी वाटतयं. कारण ज्या पुरुषांबद्दल हे जे काही चाललयं ते गप्पच आहेत. असे का. दुसरी बाजूही समोर आली पाहीजे. यामुळे सगळ्याच पुरुषांना एकाच तराजूत तोललं जातयं. सगळे पुरुष लंपट आणि नालायक. महिला मात्र सोशिक असाच मेसेज समाजात फिरतोय.

पण खरचं तसं आहे का? तर नाही. कारण शिक्षणाने सगळच बदललंय. म्हणूनच तर माझ्यासारख्या महिला आज पुरूषांच्याबरोबरीने काम करत आहेत. स्त्री पुरुष एकमेकांच्या सहकार्यानेच सर्वच क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करताहेत. यात आमच्या सहकारी असलेल्या पुरुष मित्रांचाही मोठा वाटा आहे. घरी हे तेच आहे. आजची महिला कोणाच्या सपोर्टने नोकरी करतेय तर नवऱ्याच्या, मुलांच्या, भावाच्या, वडिलांच्या आणि मित्राच्या. नाहीतर आजही आम्ही महिला घरातच चूल आणि मूल सांभाळताना दिसलो असतो. पण तसं आज तरी नाहीये. मग असे असताना या महिलांनी इतकी वर्ष अन्याय का सहन केला हा प्रश्न आहे. कसली वाट बघताय तुम्ही. कायदा आहे ना तुमच्याबाजूने मग का नाही उचलला कायद्याचा बडगा तेव्हाच. का गप्प बसलात. वेळ दिलात ना तुम्ही त्याला दुसरं भक्ष्य शोधायला. म्हणूनच तर रोज रांगा लागताहेत #MeToo वर व्यक्त होणाऱ्या मैत्रिणींच्या. शेवटी अन्याय हा अन्यायच आहे. मग तो महिलेवरील अन्याय असो वा पुरुषांवरील. त्यावर वेळीच आवाज उठवणं गरजेचं आहे.

ही झाली एक बाजू. पण दुसऱ्या बाजूचं काय.काळ बदललाय. सगळचं बदललय. बायकादेखील गेल्यात ना पुरुषांपेक्षा पुढे. त्यांच्या हनी ट्रॅपमध्ये अडकून लष्कराचे अधिकारीही उद्ध्वस्त होताहेत आणि सामान्य पुरुषही. पण असे असतानाही कायदाही तिच्याच बाजूने. म्हणजे चित भी मेरी पट भी मेरी. त्याची बाजू ऐकणार कोणीच नाही. असं कसं, देशात स्त्री पुरुष समानता आहे, असे छातीठोकपणे सांगतो ना आपण. मग आता कुठे गेली ती समानता. महिलेवर अत्याचार झाला की सगळा देश पेटून उठतो. त्यात महिलांपेक्षा पुरूषांची संख्या सर्वाधिक असते. पण स्त्रीच्या अत्याचाराला कंटाळून जेव्हा एखादा पुरूष आत्महत्या करतो. तेव्हा तो फक्त पेपरमध्ये बातमीपुरताच उरतो. असं का?

आजही आपल्या देशात स्त्रियांच्या तुलनेत आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. पण त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराची कोणालाच काही पडलेली नाही. कारण पुरुषांना आपण गृहीतच धरलय. त्यात कायद्याच जळतं कोलीत महिलांच्या हातात आहे. मग काय विचारता. सगळीकडे महिला राजच. म्हणूनच समस्त पुरुष मंडळींना एक आवर्जून सांगावस वाटतं. अहो बोला काहीतरी. प्रत्येकाला आपली लढाई स्वत:च लढायची असते. झाली ना चूक मान्य करा. व्यक्त व्हा. आणि नसेलच ना काही चूक तर सुरू करा तुम्ही पण #MeToo. सांगा तुमचा शिडीसारखा वापर करुन कोण कसं कुठं पोहचलं ते. तरच खऱ्या अर्थाने समाजात स्त्री पुरुष समानता आहे हे दिसेल आणि तुमची बाजू ऐकूण घेण्यासाठी सरकार पुरूष आयोग स्थापन करण्याचा विचार करेल. विशेषत त्या पुरुषांसाठी जे पत्नी पिडीत आहेत. नाहीतर महिलांपेक्षा किमान सहनशिलता असलेले हे पुरुष स्वत:ला निर्दोष सिद्ध करता करता थकून आत्महत्या करत सुटतील. कदाचित तेव्हा हे #MeToo चं वादळ शमलेलं असेल.

कविता लाखे यांचा ब्लॉग वाचा – #MeToo च्या निमित्ताने

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -