भाजप आज युतीबाबत मोठी घोषणा करणार

भाजप आज युतीबाबत मोठी घोषणा करणार

भाजप आज संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास युतीबाबत मोठी घोषणा करणार आहे. युती टिकणार की संपणार ते आज संध्याकाळी साडे सात वाजता ठरणार, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेबाबत पत्र पाठवले होते. त्या पत्राला भाजपने रविवारी संध्याकाळी उत्तर दिले. या उत्तरात आपण सत्ता स्थापनेतून माघार घेत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा – ‘शिवसेना चिट्स महाराष्ट्र’; नेटीझन्सची शिवसेनेवर टीका


शिवसेना अधिकृतपणे युती तोडणार?

भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करणार का? असा प्रश्न पत्रामार्फत विचारला आहे. राज्यपालांकडून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यात सकारात्मक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मात्र, शिवसेनेने भाजपसोबत अधिकृतपणे युती तोडली तरच शिवसेनेला आम्ही पाठिंबा देऊ, अशी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आज शिवसेना अधिकृतपणे युती तोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? – संजय राऊत


…तर आरामात युती सरकार आले असते

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद टोकाला गेले. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसली. त्यामुळे युतीत तणाव निर्माण झाला. दोघांमधील तणावामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागांवर यश मिळाले तर शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळाले. त्यामुळे दोघांनी ठरवले असते तर युतीत सरकार स्थापन झाले असते.

First Published on: November 11, 2019 12:38 PM
Exit mobile version