घरमहाराष्ट्र'शिवसेना चिट्स महाराष्ट्र'; नेटीझन्सची शिवसेनेवर टीका

‘शिवसेना चिट्स महाराष्ट्र’; नेटीझन्सची शिवसेनेवर टीका

Subscribe

ट्विटरवर 'शिवसेना चिट्स महाराष्ट्र' अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडींगला आहे. या हॅशटॅगमार्फत आतापर्यंत ९७ लाखांपेक्षा जास्त लोकांकडून ट्विट करण्यात आले आहेत.

भाजपने सत्ता स्थापनेत माघार जरी घेतली असली तरी त्यांच्याकडून शिवसेनेमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अनेक नेटीझन्सकडूनही शिवसेनेवर टीका केली जात आहे. ट्विटरवर ‘शिवसेना चिट्स महाराष्ट्र’ अशाप्रकारचे हॅशटॅग ट्रेंडींगला आहे. या हॅशटॅगमार्फत आतापर्यंत ९७ लाखांपेक्षा जास्त लोकांकडून ट्विट करण्यात आले आहे. त्यानंतर आता शिवेसेनेच्या समर्थकांकडूनही ‘महाराष्ट्र विथ शिवसेना’ असे हॅशटॅग वापरून ट्विट केले जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात आता ट्विटर वॉर रंगल्याचे बघायला मिळत आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्रीपदाच्या खटाटोपवर राऊत यांचे मार्मिक ट्विट

- Advertisement -

शिवसेनेवर खापर फोडू नका – संजय राऊत

दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे या अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडू नका, असे म्हटले. त्याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये यासाठी भाजपचे मोठे षडयंत्र होते, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या अगोदर समसमान खातेवाटप आणि मुख्यमंत्रीपदाबाबत बोलणे झाले होते. मात्र, निकालानंतर भाजप पक्ष आपल्या शब्दाला जागला नाही, असे देखील राऊत म्हणाले.


हेही वाचा – मेहबूबा मुफ्तींसोबत भाजपचे लव्ह जिहाद होते का? – संजय राऊत

- Advertisement -

शिवसेनेला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळणे जरुरीचे

शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद आता टोकाला गेली आहेत. दोन्ही पक्षातील युती आता संपुष्टात आली, असे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांकडे युतीची सत्ता स्थापन करण्याइतपत जागा होत्या. मात्र, मुख्यमंत्री पदावर दोन्ही पक्ष अडून बसले. त्यामुळे सत्ता स्थापनेचा तिढा आणखी वाढत गेला. आता भाजपने सत्ता स्थापनेत माघार घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, त्यासाठी शिवसेनेला १४५ आमदारांचा पाठिंबा मिळणे जरुरीचे आहे. त्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची साथ घेणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -