‘दिल्लीपुढे म्हणजे नेमके कुणापुढे झुकणार नाहीत शरद पवार?’

‘दिल्लीपुढे म्हणजे नेमके कुणापुढे झुकणार नाहीत शरद पवार?’

राज्य सहकारी बँकेचा झालेला घोटाळा हा आमच्या सरकारच्या काळात झालेला नाही. त्यामुळे शरद पवार दिल्ली पुढे झुकणार नाही असे नेमके कोणाला उद्देशून म्हणाले आहेत? असा प्रश्न भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. किरीट सोमय्या यांची मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भावर भाष्य केले. राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आहेत. सरकार ईडीचे शस्त्र वापरुन शरद पवार यांना अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय आपण दिल्लीपुढे झुकणार नाही, असे शरद पवार देखील म्हणाले आहेत. त्यामुळे शरद पवार दिल्ली पुढे म्हणजे नेमके कोणत्या सरकार पुढे झुकणार नाहीत? असा प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा – Live: मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांचा पाहुणचार घेणार – शरद पवार


छगन भुजबळही दोषी ठरले – किरीट सोमय्या

‘राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबाबत नाबार्डने रिपोर्ट दिला. बँकेत घोटाळा झाल्याचे निषपण्ण झाले. महाराष्ट्र को-ऑप मंत्रालयाने देखील घोटाळा झाल्याचे म्हटले. याशिवाय या मंत्रालयानेच आरोपींना दोषी ठरवले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकशी समिती नेमली. त्यानंतर हे प्रकरण हाय कोर्टात गेले. याप्रकरणी तपास सुरु आहे. याशिवाय हाय कोर्टात खटला सुरु आहे. हाय कोर्टाची स्वतंत्र्य अशी कार्यप्रणाली आहे. त्यात सरकारचा किंवा भाजप पक्षाच्या हस्तक्षेपाचा प्रश्नच येत नाही. याप्रकरणात सर्वच दोषी आहेत, असे आम्हाला म्हणायचे नाही. याशिवाय छगन भुजबळ यांच्या वेळी देखील शरद पवार भुजबळ दोषी नसल्याचे म्हणायचे. मात्र कोर्टात ते दोषी ठरले आणि त्यांना दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पैशांचा हा घोटाळा झाला आहे. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कोणत्याही पक्षाला जर युक्तीवाद करायचा असेल तर त्यांनी कोर्टात तो करावा’, असे किरीट सोमय्या म्हणाले.


हेही वाचा – शरद पवार ईडी प्रकरण: राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

First Published on: September 26, 2019 5:12 PM
Exit mobile version