घरविधानसभा २०१९शरद पवार ईडी प्रकरण: राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

शरद पवार ईडी प्रकरण: राष्ट्रवादी युवक काँग्रेसची ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आज मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. ‘ईडी की दादागिरी नही चलेगी’, ‘सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है’ अशा घोषणा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख आणि कार्याध्यक्ष सुरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या आजी-माजी ७० संचालकांनी नियमबाह्य कर्जवाटप केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुरींदर अरोरा यांनी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आर्थिक गुन्हे विभागाने संचालकांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र यामध्ये शरद पवार यांच्या नावाचा समावेश नव्हता. यानंतर काल पुन्हा एकदा ईडीनेही अजित पवार, इतर संचालक तसेच शरद पवारांवर गुन्हा दाखल केला. याचा परिणाम आज राज्यभर पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीकडून बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. तर राज्यातील विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. कला गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी ईडीच्या निर्णयाचे स्वागत केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -