तर एकही मायचा लाल निवडून येणार नाही; अजितदादांचे नारायण राणेंना आव्हान

तर एकही मायचा लाल निवडून येणार नाही; अजितदादांचे नारायण राणेंना आव्हान

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचा सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर भाजपचे नेते खासदार नारायणे राणे यांनी माध्यमांशी बोलताना आपण भाजपची सत्ता आणण्यासाठी मदत करणार असल्याची भूमिका मांडली होती. तसेच राष्ट्रपती राजवटीमध्ये आमदारांच्या घोडेबाजाराला महत्त्व येऊ शकते, असेही राणे म्हणाले होते. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अजितदादा म्हणाले की, “कुणीही आमदार फुटला तर त्याच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतील. मग कोणता मायचा लाल निवडून येतो, ते बघू”

आज यशवंतराव चव्हण प्रतिष्ठाण येते राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. भाजपची सत्ता आणण्यासाठी १४५ आमदारांची जुळवाजुळव करुन भाजपला मदत करु, असे राणे म्हणाले होते. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, “विधानसभा निवडणूक आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे तीन पैकी एकाही पक्षातील आमदाराने राजीनामा दिल्यास त्या पक्षातील दुसरा उमेदवार तिथून निवडणूक लढवले तसेच इतर दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर तीन चार पैकी तीन पक्ष एकत्र असतील तर कुणाचा मायचा लाल देखील निवडून येऊ शकत नाही.”

First Published on: November 13, 2019 12:08 PM
Exit mobile version