‘मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो’; उद्धव ठाकरेंचे पहिलेच तुफान भाषण

‘मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो’; उद्धव ठाकरेंचे पहिलेच तुफान भाषण

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘मी आजपर्यंतचा सर्वात भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे २५ ते ३० वर्ष विरोधात होते ते माझे मित्र झाले आहेत आणि जे मित्र होते ते विरोधात बसले आहेत. म्हणून मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की, विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत. कारण विरोधी पक्षातले माझे मित्र आहेत’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सभागृहात म्हणाले. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. विधानसभेचे सभापती नाना पटोले यांनी याबाबत घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या आसनापर्यंत नेले आणि विरोधी पक्षनेतेपदाचे सुत्रे त्यांच्या हाती दिले. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘अध्यक्ष महोदय आज या सदनामध्ये विरोधी पक्षनेतेपदी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. आपल्या निर्णयाबद्दल मी आपले आभार मानण्यासाठी आणि देवेंद्रजी यांचे अभिनंदन करण्यासाठी मी आज येथे उभा आहे. ही निवड झाल्यानंतर साहजिकच आहे,काल माझा सभागृहातला पहिला दिवस होता. मी माझ्या मंत्र्यांची सभागृहात ओळख करुन दिली. आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यासाठी माझ्यासमोर जी त्यांची ओळख आली, ती आधीच आली पाहीजे. काल माझ्या आयुष्यातला पहिला दिवस होता आणि त्यावेळेला मी माझ्या सहाकरी मित्रांची ओळख सभागृहाला करुन दिली. देवेंद्रजी आपण गेले २५ ते ३० वर्षे एकत्र आहोत. आपला परिचय आज माझ्या हातात आला. हा आधी आला असता तर बरं झालं असतं. कारण या दिवसाची आणि या नात्याची मला अपेक्षा नव्हती. एका दृष्टीने पाहिलं तर मी आजपर्यंतचा सर्वात भाग्यवान मुख्यमंत्री आहे. कारण जे २५ ते ३० वर्ष विरोधात होते ते माझे मित्र झाले आहेत. जे मित्र होते ते विरोधात बसले आहेत. म्हणून मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की, विरोधी पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत. कारण विरोधी पक्षातले माझे मित्र आहेत’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील काही मुद्दे :

First Published on: December 1, 2019 1:25 PM
Exit mobile version