गोरेगाव सभेत राज ठाकरे म्हणतात, ‘ब्लू फिल्म काढली असती, तर लोकांनी पाहिली तरी असती’

गोरेगाव सभेत राज ठाकरे म्हणतात, ‘ब्लू फिल्म काढली असती, तर लोकांनी पाहिली तरी असती’

राज ठाकरे

वांद्रे पूर्वमध्ये जाहीर सभेमध्ये आपल्याला सत्ता नको असून विरोधी पक्षनेतेपद हवं असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर तासाभरातच राज ठाकरेंची गोरेगावमध्ये जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. ‘मला ईडीने चौकशीला बोलावलं. चौकशी झाल्यानंतर बाहेर पडल्यावर पहिलं वाक्य सांगितलं माझं थोबाड थांबणार नाही. ज्याच्यात काही संबंधच नाही, तिथे निवडणुकांचं राजकारण करण्यासाठी चौकशा लावता. ज्यांना अशा धमक्या दिल्या, ते भाजपत गेले. मला, या अशा चौकशांचा काही फरक पडत नाही’, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, आरेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘मला इथल्या न्यायालयांचं देखील कळत नाही. सरकारशी संगनमत करून कशा प्रकारे काम सुरू आहे हे दिसतंय. शुक्रवारी झाडं कापायचा निर्णय देता. शनिवार-रविवार सुट्ट्या असतात. या दोन दिवसांमध्ये सगळी झाडं छाटून टाकली. सरकारला याचा जाब विचारायला कुणी नाही, म्हणून हे असं घडतं. याआधीच्या सरकारमध्ये पर्यावरणमंत्री कुणाचा होता? रामदास कदम हे शिवसेनेचे पर्यावरणमंत्री होते. ते ही झाडांची कत्तल थांबवू शकले नाहीत का? आणि आता शिवसेनेचे पक्षप्रमुख सांगतात, सरकार हाती दिल्यावर आरेला जंगल घोषित करू. आम्हाला मूर्ख समजलात का?’, असं देखील राज ठाकरे म्हणाले.
A view of the sea
Pravin Wadnere

या सभेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली. 'इथून पुढे आम्ही कुणाहीपुढे जाणार नाही. आमची इतकी वर्ष युतीमध्ये सडली आणि १२४वर अडली', असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या २०१४च्या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याच्या घोषणेची खिल्ली उडवली.

Pravin Wadnere

इथला गुजराती समाज गुजरातला जात नाही. मराठी माणूस तिथे जायचा प्रश्नच येत नाही. मग बुलेट ट्रेन जिथून जाणार, तिथल्या आदिवासींच्या जमिनी तुम्ही कशासाठी घेत आहेत – राज ठाकरे

Pravin Wadnere

मुंबईतल्या भरलेल्या ट्रेनवर काकोडकर समितीचा एक अहवाल त्यांनी काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही सरकारांना दिला होता. त्यामध्ये एक लाख कोटींच्या निधीमध्ये भारतातली सगळी रेल्वे व्यवस्था ठणठणीत होऊ शकेल, असं तो अहवाल सांगतो – राज ठाकरे

Pravin Wadnere

३७० कलम काश्मीरमध्ये लागू करण्याचा महाराष्ट्रातल्या जनतेला काय फायदा आहे? – राज ठाकरे

Pravin Wadnere

मीरा भाईंदरमध्ये नायजेरियन लोकं राहत आहेत. तिथल्या महिलांना त्याचा त्रास होतोय. त्यावर आक्षेप कुणी घेत नाही. खुलेआम ड्रग्ज घेतलं जातंय, त्यावर कुणी आक्षेप घेत नाही – राज ठाकरे

First Published on: October 10, 2019 8:39 PM
Exit mobile version