मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीहून प्रतिसाद मिळेना!

मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीहून प्रतिसाद मिळेना!

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस उलटून गेले. तरी देखील शिवसेना-भाजपचे सरकार काही स्थापन होण्याचे नाव घेत नाही. एवढंच नाही, तर शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून बसल्याने तसेच मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुरती कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. ‘आपलं महानगर’ला खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनला देखील मातोश्रीवरून प्रतिसाद मिळत नसल्याने चर्चा पुढे जात नसल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर बऱ्याचदा फोन केला. मात्र प्रत्येकवेळी काही ना काही कारण देत मातोश्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं टाळत असल्याचे देखील भाजपच्या नेत्यांनी खासगीत बोलताना सांगितले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेससोबत वाढलेली जवळीक देखील मुख्यमंत्र्यांना डोकेदुखीची ठरत असल्याने नेमकं शिवसेनेला कसं गोंजारायचं? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या नेत्यांना पडला आहे.


हेही वाचा – शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत-राऊत


म्हणून भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार…

दरम्यान, मातोश्रीवरून प्रतिसाद मिळत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांना राज्यपालांना भेटून राज्यपालांशी चर्चा करण्यास सांगितल्याचेही समजते. विशेष बाब म्हणजे शिवसेना दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतूनही दबाव वाढत असून नेमकं काय करायचं? अशी चिंता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सतावू लागली आहे.

First Published on: November 6, 2019 9:18 PM
Exit mobile version