घरमुंबईशिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत - राऊत

शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाहीत – राऊत

Subscribe

‘महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवल्याशिवाय उद्धव ठाकरे स्वस्थ बसणार नाही. सुधीर मुनगंटीवार थोड्या वेळापूर्वी म्हणाले, की लवकरच गोड बातमी मिळेल. कदाचित तेच तुम्हाला गोड बातमी देतील आणि ती बातमी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल ही असेल’, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे शिवसेना अजून देखील मुख्यमंत्रीपदाविषयी ठाम असल्याचंच पुन्हा एकदा संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्या सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांची राज्यपालांशी होणारी चर्चा महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

सत्तास्थापनेच्या महानाट्याचा पुढचा अंक!

आज दिवसभर घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. सकाळी सर्वात आधी अहमद पटेल यांनी घेतलेली सोनिया गांधींची भेट, त्यानंतर संजय राऊतांनी घेतलेली शरद पवारांची भेट, भाजपला संख्याबळ असेल तर सत्तास्थापनेचा दावा करण्याचं केलेलं आवाहन, शरद पवारांनी शेवटच्या तासाभरात काहीतरी होईल असा दिलेला इशारा, हुसेन दलवाईंनी संजय राऊतांच्या भेटीनंतर भाजपचं सरकार येत नाही असं केलेलं वक्तव्य या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तास्थापनेच्या महानाट्याचा आजचा अंकही विशेष चर्चेत राहिला!

- Advertisement -

‘…तर जनतेला त्याचा आनंदच!’

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. ‘सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. सगळ्यांनीच राज्यपालांची भेट घेतली आहे. विशेषत: ते सिंगल लार्जेस्ट पार्टी असताना त्यांनी भेट घेण्यात गैर काहीही नाही. आणि ते जर उद्या १४५ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करून सत्तास्थापनेचा दावा करत असतील, तर राज्यातल्या जनतेला त्याचा आनंदच होईल’, असा खोचक टोमणा यावेळी संजय राऊत यांनी भाजपला लगावला.


हेही वाचा – चंद्रकांत पाटील यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेणार-सुधीर मुनगंटीवार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -