उत्सव लोकशाहीचा, देश कर्तव्याचा!

उत्सव लोकशाहीचा, देश कर्तव्याचा!

२१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. आपले एक मत महाराष्ट्राचे भविष्य घडवू शकते. त्यामुळे चला घराबाहेर पडा आणि मतदान करूनच या! राज्यातील २८८ मतदारसंघात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात आहेत. आजच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा आणि पोलीस सज्ज झाले आहेत. येत्या २४ तारखेला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतदारांसाठी सोयी-सुविधा
१) किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. २)दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD अ‍ॅपची सुविधा देण्यात आली आहे. ३)सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था ४) दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था. ५) अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.६)लहान मुलासह मतदानास येणार्‍या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

एकूण मतदार ः ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६००
पुरुष मतदार ः २ कोटी ६८ लाख ७५ हजार ७५०
महिला मतदार ः ४ कोटी २८ लाख ४३ हजार ६३५
तृतीयपंथी मतदार ः २ हजार ६३४
दिव्यांग मतदार ः ३ लाख ९६ हजार
सर्व्हिस मतदार ः १ लाख १७ हजार ५८१

ईव्हीएम यंत्रणा
विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

मतदान केंद्रे

एकूण मतदान केंद्रे -96 हजार 661
मुख्य मतदान केंद्र – 95,473
सहायक मतदान केंद्र – 1,188
महिलांसाठी-352 ‘सखी केंद्रे’

मतदान प्रक्रियेसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेचे काम सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत.
– शिवाजी जोंधळे,जिल्हा निवडणूक अधिकारी,

मोबाईल नेऊ नका!
मतदान करण्यासाठी जात असताना मोबाईल घेऊन जाऊ नका. कारण मोबाईल फोनसह मतदान केंद्रात जाण्यास परवानगी नाही. त्यामुळे मोबाईल घेऊन गेलात तर तो बाहेर ठेवावा लागू शकतो. त्यामुळे गैरसोय होऊ शकते. म्हणून मतदान करायला जाताना मोबाईल घेऊन जाऊ नये.

First Published on: October 21, 2019 6:58 AM
Exit mobile version