Tuesday, April 30, 2024
घरमानिनीRecipe : अवघ्या 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा बुर्जी सँडविच

Recipe : अवघ्या 10 मिनिटांमध्ये झटपट बनवा बुर्जी सँडविच

Subscribe

दररोज सगळ्यांकडे नाश्त्यामध्ये अनेक विविध प्रकार असतात. मात्र, काही पदार्थांची तयारी ही आदल्या दिवसापासून करावी लागते. परंतु एखादा झटपट नाश्ता करायचा असल्यास अंडा सँडविच ही बेस्ट रेसिपी आहे.

साहित्य :

- Advertisement -
  • 2 चमचा बटर
  • 4 अंडी
  • 4 ब्रेड
  • 3-4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • 1 बारीक चिरलेला कांदा
  • 1 बारीक चिरलेला टोमॅटो
  • 1/2 बारीक चिरलेली शिमला मिरची
  • 1 चमचा बारीक कोथिंबीर
  • आवश्यकतेनुसार मीठ

कृती :

- Advertisement -
  • सर्वप्रथम गॅस वर एका पॅन ठेवा आणि त्यामध्ये एक चमचा तेल घाला.
  • आता त्यामध्ये कांदा, मिरची परतून घ्या.
  • त्यानंतर त्यात टोमॅटो आणि अर्धी चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्या.
  • आता एका बाऊलमध्ये अंडी फोडून घ्या आणि त्यात मीठ टाकून फेटून घ्या.
  • आता त्या कांदा-टोमॅटोच्या मिश्रणामध्ये फेटलेली अंडी मिक्स करून त्याची बुर्जी करून घ्या.
  • आता दुसरीकडे एका ब्रेडवर बटर, रेड चिली सॉस लावून त्यावर बुर्जीचा थर पसरवून घ्या आणि त्यावर दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.
  • आता ब्रेड सँडविच मेकरमध्ये भाजून घ्या.
  • तयार बुर्जी सँडविच सर्व्ह करा.

हेही वाचा :

Recipe : अंड्यापासून तयार करा चविष्ट लॉलीपॉप

- Advertisment -

Manini