Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : घरातील आनंददायी वातावरणासाठी फॉलो करा या वास्तू टिप्स

Vastu Tips : घरातील आनंददायी वातावरणासाठी फॉलो करा या वास्तू टिप्स

Subscribe

घरात सुख-समृद्धी आणि आनंददायी वातावरणासाठी वास्तुशास्त्राची (Vastu Tips For Home) भूमिका महत्त्वाची असते. असे असले तरी अनेकदा लोक वास्तुशास्त्राकडे (Vastu Shastra) दुर्लक्ष करतात. वास्तुशास्त्रानुसार, घराची सजावट केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे घरात सुख-समृद्धीसह आनंददायी वातावरण निर्माण होते. ज्या लोकांच्या घरात तणावाचे आणि भांडणाचे वातावरण असते, त्या घरातील लोकांच्या मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्राच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्या करून तुम्ही घरात आनंदी आणि निरोगी राहू शकता.

घरात स्वच्छता

स्वच्छतेला महत्त्व आहे, असे म्हणतात की देवी लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. अशा परिस्थितीत घर स्वच्छ ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

- Advertisement -

मीठाच्या पाण्याने घर स्वच्छ करा

घराची आणि प्रवेशद्वार स्वच्छ करण्यासाठी दररोज मीठाचे  पाणी वापरू शकता. हा उपाय केल्याने जीवनात सकारात्मकता आणि कामात यश मिळते.

घरात दिवा कापूर लावा

घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी तसेच शांततेसाठी, दिवा, कापूर लावा. घर शुद्ध करण्यासाठी सिट्रोनेला आणि दालचिनीचा वापर करा.

- Advertisement -

तुळशीची पूजा करावी

घरातील सुख-समृद्धीसाठी तुळशीची पूजा दररोज करावी आणि संध्याकाळी तुळशीच्या रोपाला पाणी द्यावे.

संध्याकाळी दिवा लावावा

घरातील सुखासाठी, दररोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा, असे म्हटले जाते की, संध्याकाळी दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते.

सूर्यदेवाला जल अर्पण

रोज सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे, असे केल्याने कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते आणि कामात यश मिळते.

सुखदायक संगीत लावा

वास्तुशास्त्रानुसार, सुखदायक संगीताचा आवाज घरामध्ये समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करतो. म्हणून, दररोज काही मिनिटे श्लोक, मंत्र आणि सुखदायक बासरीचे आवाज ऐका. यासह मुख्य दरवाजाजवळ विंड चाइम किंवा बेल लटकवा.

मोर पंख

मोर पंख हे सकारात्मकतेचे प्रतीक आहे. मोर पंख वास्तुदोष दूर करतात. माता लक्ष्मीची कृपा लाभण्यासाठी घराच्या मुख्य गेटच्या आग्नेय दिशेला गणेशाची मूर्ती आणि मोराची पिसे लावा.

हेही वाचा : तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमची इष्ट देवता

____________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini