निसर्गामध्ये असे अनेक घटक आहेत, ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील अनेक लहान-मोठ्या समस्यांवर उपाय शोधू शकतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा हवी असते, घरातील वास्तू दोषामुळे घरात सकारात्मकतेचा अभाव निर्माण होतो. यामुळे घरात आजारपण, कलह, कौटुंबिक मतभेद, आर्थिक चणचण भासणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी खड्या मीठाचे काही उपाय करु शकता.
खड्या मिठाचे उपाय
- बारीक मिठापेक्षा खडे मीठ आपल्या आरोग्याबरोबरच वास्तूसाठी देखील जास्त उपयोगी आहे. खडेमीठ वास्तूमधील दोष दूर करण्यासाठी जास्त प्रभावकारी आहे.
- तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून घर पुसून घ्या. असं नियमित दररोज केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल.
- घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रत्येक शनिवारी घरातील प्रत्येक कोपऱ्यात एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ ठेवून द्या. दुसऱ्या शनिवारी ते मीठ टाकून पुन्हा दुसरे नवीन मीठ ठेवा. या उपायाने देखील घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
- घरातील बाथरूम आणि शौचालयाची स्थिती ठीक नसल्यास तुम्ही बाथरूम आणि शौचालयामध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडे मीठ ठेवून द्या. यामुळे तुमच्या घरातील बाथरूम आणि शौचालयातील दोष देखील दूर होतील.
हेही वाचा :