जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपलं मरण देखील सोबत घेऊन येतो. मात्र, मृत्यूची भीती प्रत्येकालाच वाटते. मृत्यू कधी, कुठे, कसे येईल हे कोणालाच ठाऊक नसतं. यात काही व्यक्तींचा मृत्यू वृद्धापकाळाने होतो, तर काहींचा एखाद्या गंभीर आजाराने, अपघाताने किंवा इतर कोणत्याही कारणाने होतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? हिंदू धर्मातील गरुड पुराणात आणि शिव पुराणामध्ये व्यक्तीच्या मृत्यूबाबत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणांमध्ये, मरण पावणाऱ्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूआधी कोण-कोणते संकेत मिळतात. याबाबत सविस्तर सांगण्यात आले आहे.
मृत्यूआधी व्यक्तीला मिळतात संकेत
- पुराणानुसार, मृत्यूआधी व्यक्तीला सूर्य-चंद्रचा प्रकाश दिसेनासा होतो.
- जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो त्यावेळी त्याचे शरीर हळूहळू हल्का पिवळे किंवा पांढरे पडते. शिवाय त्याच्या शरीरातील एक-एक अवयवांची हालचाल बंद पडते. अशा व्यक्तीची जीभ, कान, नाक हळूहळू काम करणं बंद करते.
- मृत्यूच्या काही दिवसआधी मृत होणाऱ्या व्यक्तीला त्याचे प्रतिबिंब आरशात किंवा पाण्यात दिसत नाही.
- Advertisement -
- अशा व्यक्तीची दृष्टी देखील हळूहळू कमी होऊ लागते.
- मृत्यूआधी व्यक्तीची सावली देखील त्याच्यापासून दूर होऊ लागते.
- मृत्यूआधी व्यक्तीला त्याने आयुष्यात केलेल्या सर्व वाईट गोष्टी आठवतात आणि त्यावर त्याला प्रायश्चित्त करावेसे वाटते.
- या व्यक्तीला त्याच्या आई-वडीलांची तसेच मृत पुर्वजांची आठवण येते.
- मृत्यूआधी व्यक्तीला त्याच्या सर्व कुटुंबीयांना, नातेवाईकांना भेटण्याची इच्छा होते.
हेही वाचा : दूध सतत ऊतू जाते? असू शकतो अशुभ संकेत
- Advertisement -
- Advertisement -