घरदेश-विदेशरेल्वे अपघाताचे सत्र सुरूच; ओडिशा रेल्वे अपघातानंतर जबलपूरमध्ये भीषण अपघात

रेल्वे अपघाताचे सत्र सुरूच; ओडिशा रेल्वे अपघातानंतर जबलपूरमध्ये भीषण अपघात

Subscribe

नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातानंतर ओडिशामधील बारगढ जिल्ह्यात मालगाडीला अपघात झाला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे विभागात दोन रेल्वे अपघात झाले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.

ओडिशा रेल्वे अपघातानंतर जबलपूरच्या कटनी येथील रेल्वे यार्डमध्ये काल (6 जून) रात्री 7.30 च्या सुमारास मालगाडीच्या दोन बोगी रुळावरून घसरल्या. यानंतर अवघ्या चार तासांनी रात्री 10.30 वाजता भेडाघाटाजवळ भिटोनी येथे गॅसने भरलेल्या मालगाडीचे व्हॅगन रुळावरून घसरले. एकाच दिवसात दोन मोठे रेल्वे अपघात झाल्यानंतर विभागातील रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली आहे. अपघातानंतर जबलपूर रेल्वे विभागाच्या नियंत्रण कार्यालयात उपस्थित अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. दोन्ही अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Train accident session continues; Horrible accident in Jabalpur after Odisha train accident)

- Advertisement -

 अनलोडिंग दरम्यान अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, शाहपुरा भिटोनी रेल्वे स्थानकावरून भारत पेट्रोलियम डेपो स्टेशन बसविण्यात आले आहे. ज्यामध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचा साठा करण्यासाठी डेपो आहे. मालगाडी कारखान्याच्या आत रॅक रिकामी करण्यासाठी निघाली होती, मात्र मालगाडी मुख्य गेटजवळ आल्यावर दोन डबे रुळावरून घसरले. दरम्यान, मुख्य मार्गावरील रेल्वेच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. अपघातानंतर जबलपूर रेल्वे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नानंतर टँकर पुन्हा रुळावर आणून मालगाडी रवाना करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही अभिमानाची बाब आहे. सध्या या अपघाताचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मुख्य मार्गावर रेल्वेची वाहतूक सामान्य
पश्चिम मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले की, एलपीजीने भरलेल्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले, त्यामुळे मेन लाइनच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. मुख्य मार्गावर रेल्वेची वाहतूक सामान्य आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सकाळी ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -