Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligiousदररोज केवळ 5 मिनिट करा 'श्री राम' नामाचा जप; आहेत अनेक फायदे

दररोज केवळ 5 मिनिट करा ‘श्री राम’ नामाचा जप; आहेत अनेक फायदे

Subscribe

हिंदू धर्मात देवी-देवातांच्या नियमित पूजेसोबतच त्यांच्या मंत्राचं आणि स्तोत्रांचं पठण करणं महत्त्वपूर्ण मानलं जातं. देशाभरात श्री रामांचे देखील अनेक भक्त आहेत. शास्त्रानुसार, श्री राम असे दैवत आहेत ज्यांचे स्मरण साक्षात श्री हनुमान आणि महादेव देखील करतात. असं म्हणतात, श्री रामांचा नाम जप केल्याने व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक शक्ती प्राप्त होते. तसेच अनेक दोषांपासून व्यक्तीची सुटका होते.

‘श्री राम’ नामाचा जप करण्याचे फायदे

Shri Ram" Images – Browse 63,206 Stock Photos, Vectors, and Video | Adobe Stock

  • पौराणिक ग्रंथांनुसार, श्री राम भगवान विष्णूंचा अवतार आहे. तसेच शिवरुपी हनुमान त्यांचे प्रिय भक्त आहेत. श्री हनुमानांना प्रसन्न करण्यासाठी देखील अनेक राम नामाचा जप करतात.
  • शास्त्रानुसार, ‘राम’ या शब्दात खूप ताकद असून केवळ या नावाच्या उच्चाराने ब्रह्मांडातील सकारात्मक शक्ती शरीरात प्रवेश करते.
  • ज्या व्यक्ती अनेक आरोग्य समस्या आहेत त्यांना या नावाचा नियमित 108 वेळा जप करावा.
  • राम नामाचा जप केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच ब्लड प्रेशर, ड्रिप्रेशन, अस्वस्थता देखील दूर होते.
  • दररोज राम नामाचा जप केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते.
  • राम नामाच्या जपाने शनी आणि मंगळ ग्रहाचा अशुभ प्रभाव दूर होतो.
  • राम नामाचा जप करण्यापूर्वी जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं.

जप कसा करावा

  • धार्मिक ग्रंथानुसार सकाळी किंवा संध्याकाळी राम नामाचा जप करणं उत्तम मानले जातं.
  • घरातील स्वच्छ ठिकाणी बसून समोर धूप, दिप लावून या मंत्राचे पठण करावे.
  • जप करताना कोणताही वाईट, नकारात्मक विचार मनात आणू नये. जप करताना मग एकाग्र करावे.

हेही वाचा : महामृत्युंजय मंत्राचा जप का करावा? वाचा फायदे

- Advertisment -

Manini