घरदेश-विदेशAyodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार; पीएसी कमांडो जखमी,...

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर परिसरात गोळीबार; पीएसी कमांडो जखमी, प्रकृती गंभीर

Subscribe

लखनऊ : अयोध्येतील राम मंदिर परिसरात मंगळवारी झालेल्या गोळीबारात पीएसी कमांडो जखमी झाला. स्वतःच्याच एके-४७ रायफलीतून सुटलेली गोळी कमांडोच्या छातीच्या बाजूला लागली असून त्याची प्रकृती गंभीर आहे. लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे. मंदिर परिसरात मंगळवारी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

गोळी लागलेल्या कमांडोची प्रकृती चिंताजनक आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. दरम्यान, ही घटना चुकून घडल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. मात्र, हा गोळीबार नेमका कसा झाला याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mahayuti : रिपाइंला झालेली जखम कशी भरून काढणार? रामदास आठवलेंचा फडणवीसांना सवाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. पीएसी कॅम्पमधून पोलिसांना जोरदार गोळीबाराचा आवाज आला. यात पीएसी कमांडो ३२ बटालियनचे रामप्रसाद (५०, रा. जैस, अमेठी) जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. हे पाहून कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला. एसपी सिक्युरिटी पंकज पांडे यांनी जखमी कमांडोला तातडीने श्रीराम हॉस्पिटलमध्ये नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ दर्शन नगर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, मात्र, त्याची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांच्या पथकाने त्याला लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये भारती केले. अयोध्येतील वैद्यकीय महाविद्यालयाचे आपत्कालीन प्रभारी डॉ. विनोद कुमार आर्य यांनी सांगितले की, गोळी राम प्रसाद यांच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली आहे. प्रसाद हा मूळचा अमेठी जिल्ह्यातील अचलपूर गावचा आहे. सहा महिन्यांपासून तो राम मंदिर परिसरात कार्यरत आहे.

- Advertisement -

रामजन्मभूमी पोलीस स्टेशनचे एसओ देवेंद्र पांडे म्हणाले की, कमांडो रामप्रसाद आपली एके-४७ रायफल साफ करत असताना अचानक गोळी झाडली गेली. आणि ही गोळी त्याच्या छातीत घुसल्याने कमांडो गंभीर जखमी झाला.

हेही वाचा – Thackeray Group : ‘चारशे पार’चा मुजरा आणि ‘पुन्हा येईन’चा गजरा; उद्धव गटाची भाजपवर सडकून टीका

मंदिर परिसरात गोंधळ

या घटनेमुळे मंदिर परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळीबाराच्या आवाजाने राम मंदिरात उपस्थित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जखमी जवानाला तात्काळ डिव्हिजनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जेथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला लाईफ सपोर्ट सिस्टीमसह लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -